मध्यरात्री महिलेच्या घरात घुसून पोलिसाने केला बलात्कार; कुटुंबीयांनी केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 09:37 PM2021-10-12T21:37:58+5:302021-10-12T21:38:45+5:30

Rape Case : हा धक्कादायक प्रकार भारत-पाकिस्तान सीमेवरील बाडमेर जिल्ह्यात राजस्थानमध्ये घडला आहे. 

Police enter into a woman's house in the middle of the night and raped her; Beaten by family | मध्यरात्री महिलेच्या घरात घुसून पोलिसाने केला बलात्कार; कुटुंबीयांनी केली मारहाण

मध्यरात्री महिलेच्या घरात घुसून पोलिसाने केला बलात्कार; कुटुंबीयांनी केली मारहाण

Next
ठळक मुद्देआरोपी कॉन्स्टेबल  सुल्तान सिंह हा बाडमेर जिल्ह्यातील शिव पोलीस ठाण्यात तैनात आहेत.

एका पोलीस कॉन्स्टेबलने दलित महिलेच्या घरात घुसून बलात्कार केल्याची हादरून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. संबंधित पीडितेनं आरडाओरड केल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य आणि शेजारचे लोक जागे झाले. त्यांनी या नराधम पोलीस कॉन्स्टेबलला पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली. जखमी पोलीस कॉन्सटेबलला जिल्हा मुख्यालयातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा धक्कादायक प्रकार भारत-पाकिस्तान सीमेवरील बाडमेर जिल्ह्यात राजस्थानमध्ये घडला आहे. 

प्राप्त माहितीनुसार, आरोपी कॉन्स्टेबल  सुल्तान सिंह हा बाडमेर जिल्ह्यातील शिव पोलीस ठाण्यात तैनात आहेत. सोमवारी रात्री महिला घरात एकटी असल्याचे पाहून कॉन्स्टेबलने घरात प्रवेश केला होता. तेथे त्याने महिलेला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर तिच्या कुटुंबातील इतरांना देखील जाग आली. त्यांनी घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबलला पकडून बेदम मारहाण केली. यामुळे कॉन्स्टेबल जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत बाडमेर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक आनंद सिंह यांच्याकडे सोपवण्यात आलाय.

पोलीस अधीक्षक आनंद शर्मा म्हणाले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी कॉन्स्टेबलला बाडमेर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पीडितेने कॉन्स्टेबल सुल्तान सिंह याच्यावर रात्री 2 वाजता घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्याचा आणि तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Police enter into a woman's house in the middle of the night and raped her; Beaten by family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.