त्रिकोणी प्रेम प्रकरणातून हत्येचा पोलिसांचा अंदाज, पर्वरी खून प्रकरणात ५ जणांना अटक
By काशिराम म्हांबरे | Published: April 17, 2024 04:37 PM2024-04-17T16:37:59+5:302024-04-17T16:38:28+5:30
मुख्य संशयित विकास यादव या सध्या फरार आहे
काशिराम म्हांबरे लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: पर्वरी येथील ऑडिट भवनाच्या जवळ मंगळवारी झालेला खून त्रिकोणी प्रेम प्रकरणातून घडल्याची शक्यता पोलिसांकडून वर्वतली जात आहे. या खून प्रकरणात पोलिसांनी खतेश कांदोळकर, सुमान बरीक, सचिन सहानी, तनय कांदोळकर व सचिन सिंग ( सर्वजण कांदोळी) या पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. मुख्य संशयित विकास यादव या सध्या फरार आहे. त्याच्या मार्गावर सध्या पोलीस आहेत. मयताचे मुख्य संशयिताच्या प्रियसेशी हित संबंध जुळल्याने त्याने रागातून हा खुनाचा प्रकार घडला आसावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारी पहाटे दरम्यान एका अज्ञात युवकाचा संशयास्पदरीत्या मृतदेह रस्त्याच्याकडेला साप़डला होता. त्यावेळी त्याच्या शरीरावर काही जखमा आढळून आलेल्या. त्यामुळे सदर प्रकार खूनातून घडल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात होती. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी गोवा वैद्यकिय महाविद्यालयात पाठवून देण्यात आला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशी दरम्यान तो मृतदेह रेहबर खान ( २१ उत्तरप्रदेश ) या युवकाचा असल्याचे आढळून आले होते. मयत एका सलूनमध्ये कामाला होता. तेथेच लागून असलेल्या एका सुपर मार्केटातील एका युवतीसोबत त्याचे प्रेम प्रकरण होते. त्या युवतीवरून मयताला मारहाण झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मयताच्या चुलत भावाने तशी माहिती पर्वरी पोलिसांना दिली होती. मयत तसेच त्या मुलीच्या दुसऱ्या प्रियकरात हत्येपूर्वी वाद झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. या प्रकरणातील तपास कार्य निरीक्षक जितेंद्र माईक यांच्याकडून उपअधिक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.