गाडी भाड्याने लावतो सांगून चोरट्यांनी टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 08:44 PM2020-11-27T20:44:32+5:302020-11-27T20:45:07+5:30
Crime News : आंतरराज्यीय वाहनचोर टोळीला अटक, २१ गाड्या जप्त
नवी मुंबई : गाडी भाड्याने लावण्याच्या बहाण्याने ताब्यात घेऊन चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनीअटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 20 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सर्व वाहने बनावट कागदपत्रांद्वारे राज्याबाहेर विकण्यात आली होती.
नेरुळ येथे ट्रॅव्हल पॉईंट नावाने कार्यालय थाटून हा गुन्हा घडला आहे. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाली होती. या गुन्ह्याच्या अनुशंघाने गुन्हे शाखेचे मध्यवर्ती शाखेचे पथक तपास करत होते. यादरम्यान भोईसर येथून एकाला अटक केल्यानंतर मुख्य सूत्रधाराची माहिती समोर आली होती. त्याला इतर साथीदारांसह बेंगलोर येथून अटक केली आहे. आशिष पुजारी उर्फ अँथोनी पॉल, सत्यप्रकाश वर्मा उर्फ बाबू, अयान उर्फ अँथोनी पॉल छेत्तीयार, मोहम्मद वसीम मोहम्मद फरीद शेख व जावेद अब्दुलसत्तार शेख अशी त्याची नावे आहेत. त्यांच्याकडून फसवणूक करून चोरलेल्या 1 कोटी 21 लाख रुपये किमतीच्या महागड्या 20 गाड्या जप्त केल्या आहेत.
या टोळीवर मुंबई, नवी मुंबई तसेच पुणेत गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये पुणेतून 79 तर दिंडोशी येथून 10 गाड्या चोरल्या होत्या. त्यामध्ये इनोव्हा क्रिस्टा, स्कॉर्पिओ, वॅग्नार, सँट्रो, डिझायर अशा विविध प्रकारच्या गाड्या आहेत. यापैकी काही गाड्या दमन येथे दारूच्या तष्करीसाठी वापरल्या जात होत्या. तशा नेरुळ येथून चोरलेल्या 14 पैकी 09 गाड्या दमन येथे दारू तष्करी प्रकरणी जप्त केलेल्या आहेत. या टोळीने राज्यभरातून 300 हून अधिक गाड्या चोरी करून गुजरात, राजस्थान तसेच नेपाळ येथे विकल्याचे शक्यता आहे.
आलिशान हॉटेल किंवा कंपनीमध्ये भाड्याने लावण्यासाठी या गाड्या घेतल्या होत्या. त्याकरिता वाहन चालकासोबत लिखित करार करून सुरवातीचे दोन ते तीन महिने नियमित भाडे द्यायचे. मात्र त्यानंतर कार्यालय बंद करून पळ काढायचे.नेरुळ येथे असाच गुन्हा घडल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, अपर पोलीस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, सहायक निरीक्षक राजेश गज्जल, ज्ञानेश्वर भेदोडकर, निलेश तांबे, संजय पवार, उर्मिला बोराडे, लक्ष्मण कोरकर, राहुल वाघ, विजय खरटमोल, किरण राऊत, मिथुन भोसले, नितीन जगताप, प्रकाश साळुंखे, मेघनाथ पाटील, विष्णू पवार, पोपट पावरा, आतिष कदम, सतीश सरफरे, सचिन टिके, सतीश चव्हाण व रुपेश कोळी यांचे पथक तयार केले होते. अटक केलेल्या टोळीचा नवी मुंबईतला नववा गुन्हा असून यापूर्वी मुंबईत त्यांना अटक देखील झालेली आहे. मात्र टोळीचा सूत्रधार पहिल्यांदाच पोलिसांच्या हाती लागला आहे.