पिस्तुलाचा धाक दाखवत दुचाकी घातली पाेलिसांच्या अंगावर, 25 हजारांची लाच घेऊन पोलिस झाला फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 10:50 PM2021-03-24T22:50:40+5:302021-03-24T22:51:34+5:30
Bribe Case : गुन्हा दाखल करण्यासाठी कांदेकर यांनी तक्रारदार यांच्याकडे 22 मार्च 21 राेजी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली हाेती.
माणगाव ः पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक गणेश कांदेकर यांनी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच स्विकारुन ते पाेलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले आहेत. पाेलिस कांदेकर यांचा शाेध घेत आहेत. गुन्हा दाखल करण्यासाठी कांदेकर यांनी तक्रारदार यांच्याकडे 22 मार्च 21 राेजी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली हाेती.
त्यानंतर तडजाेड झाल्यवर 25 हजार देण्याचे मान्य झाले. दरम्यान तक्रारदार यांनी अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार 24 मार्च 21 राेजी सापळा लावण्यात आला. काळनदी पुलाला लागून असलेल्या रॉयल फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक मॉल या ठिकाणी लाचेची रक्कम कांदेकर यांनी स्वीकारली. त्यावेळी सापळा लावलेल्या पाेलिसांनी कांदेकर याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र कांदेकर तेथून फरार झाला.
कांदेकर हा बुलेटने (दुचाकी) तीनबत्ती नाका येथे आला असता त्याला पाेलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पिस्तुलाचा धाक दाखवत पळुन जात असताना कांदेकर यांनी दुचाकीची पाेलिस हवालदरा माेरे यांना धडक दिली. त्यानंतर कांदेकर महाड दिशेकडे फरार झाला. माेरे यांना दुखापत झाली आहे..........