विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 03:13 PM2020-07-06T15:13:18+5:302020-07-06T15:15:07+5:30
गुंड विकास दुबेला पकडण्यासाठी पोलिसांच्या २५ टीम तयार करण्यात आल्या आहेत.
कानपूर चकमकीत ८ पोलिसांची हत्या झाल्यानंतर संशयाच्या फेऱ्यात अडकलेले चौबेपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख विनय तिवारी यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, गुंड विकास दुबेला पकडण्यासाठी पोलिसांच्या २५ टीम तयार करण्यात आल्या आहेत. विकासबाबत माहिती देणाऱ्यास आयजींनी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, चकमकीत जखमी झालेल्या ७ पोलिसांवर कानपूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. लखनौ पोलिसांनी विकास दुबे याच्या कृष्णानगरस्थित घरावर छापा मारला. मात्र, तो तिथे सापडला नाही. त्यानंतर आता कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत कुमार यांनी बक्षिसाची रक्कम २. ५० लाख इतकी वाढवली आहे.
विकास दुबेची माहिती देणाऱ्याला याआधी ५० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार होते. त्यात वाढ करून एक लाख रुपये करण्यात आली होती. आता त्यात आणखी वाढ करून बक्षिसाची रक्कम अडिच लाख रुपये करण्यात आली आहे. कानपूरचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की, तिवारी यांच्यावरील आरोपांची चौकशी केली जात आहे. जर त्यांचा किंवा कोणत्याही पोलिसाचा या घटनेशी संबंध आढळून आला, तर त्याला केवळ बरखास्तच केले जाणार नाही, तर तुरुंगात पाठविले जाईल.पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, काही पोलिसांचीही चौकशी केली जात आहे. याचा शोध घेतला जात आहे की, पोलीस त्याच्या घरी धाड टाकणार याची त्याला माहिती कशी मिळाली. त्यामुळे त्याने पूर्ण तयारीनिशी पोलीस दलावर हल्ला केला.
पोलिसांनी विकास दुबेचे घर का पाडले? याबाबत विचारणा केली असता अग्रवाल म्हणाले की, गावातील लोकांचे म्हणणे आहे की, दुबेने गुंडागर्दी करून लोकांच्या जमिनीवर कब्जा केला होता. लोकांकडून वसुली करून हे घर बनविले होते.अग्रवाल यांनी सांगितले की, विकासला पकडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टीम राज्याच्या विविध भागांत आणि अन्य राज्यांतही धाडी टाकत आहेत. जवळपास ५०० मोबाईल फोनची तपासणी केली जात असून, त्या माध्यमातून विकासबद्दल काही माहिती मिळते का, ते शोधले जात आहे.
Reward for arrest of Vikas Dubey involved in gunning down 8 UP policemen, increased to Rs 2.50 lakh: ADG Law and Order Prashant Kumar
— Press Trust of India (@PTI_News) July 6, 2020
Madhya Pradesh Police on alert in the wake of killing of 8 policemen by members of Vikas Dubey's gang in Uttar Pradesh's Kanpur. The MP police have stepped up vigil in districts bordering UP: officials
— Press Trust of India (@PTI_News) July 6, 2020