कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे; ९ मुली अन् ६ मुलांना पोलीसांनी पकडले रंगेहाथ, नांदेडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 05:27 PM2021-12-29T17:27:38+5:302021-12-29T17:43:51+5:30

पोलिसांकडून या परिसरात धाडीचे कारवाई सत्र सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

Police have arrested nine girls and six boys for making Sexual obscene at a coffee shop in Nanded. | कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे; ९ मुली अन् ६ मुलांना पोलीसांनी पकडले रंगेहाथ, नांदेडमधील घटना

कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे; ९ मुली अन् ६ मुलांना पोलीसांनी पकडले रंगेहाथ, नांदेडमधील घटना

Next

नांदेड: नांदेड शहरातील आनंदनगर भागात असलेल्या राज मॉल येथील कॉफी शॉपवर मंगळवारी पोलिसांनी धाड टाकली. यावेळी अश्लिल चाळे करताना नऊ मुली आणि सहा मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

शहरातील विद्यार्थ्यांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या भाग्यनगर, बाबानगर, कैलासनगर, आनंदनगर, श्यामनगर परिसरात कॉफी शॉप, नेट कॅफे, लंच पॉईंटच्या नावाने दुकाने उघडली आहेत. यातील बहुतांश दुकानदारांनी आतील बाजून अंधारमय खोली करुन बसण्याची व्यवस्था केली आहे. बाहेरुन जाणाऱ्यांना आतील काहीही दिसत नाही. त्याचबरोबर काही ठिकाणी मुला- मुलींना बसण्यासाठी स्वतंत्र कंम्पार्ट बनविले आहेत. या ठिकाणी बसण्यासाठी तासानूसार पैसे आकारले जातात. परंतू यातून अश्लिल चाळे करणाऱ्यांना हक्काच्या जागा उपलब्ध होऊन छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. 

दरम्यान, पोलिसांनी आनंदनगर भागात टाकलेल्या धाडीत पकडलेल्या सर्व मुली अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांना कळवून त्यांना समज देण्यात आला. त्यानंतर त्यांना सोडले. परंतू पोलिसांकडून या परिसरात धाडीचे कारवाई सत्र सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Police have arrested nine girls and six boys for making Sexual obscene at a coffee shop in Nanded.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.