जिथे ऑइलची पाइपलाइन तिकडे तो भाड्याने घ्यायचा पत्र्याचा शेड; ४०० कोटी कमावले, शेवटी बिंग फुटलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 06:12 PM2023-01-05T18:12:34+5:302023-01-05T18:19:36+5:30

राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये तेल चोरीचा सूत्रधार संदीप गुप्ताविरुद्ध २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

Police have arrested Sandeep Gupta, who stole oil worth around Rs 400 crores by breaking pipelines of oil companies in many states of the country. | जिथे ऑइलची पाइपलाइन तिकडे तो भाड्याने घ्यायचा पत्र्याचा शेड; ४०० कोटी कमावले, शेवटी बिंग फुटलं!

जिथे ऑइलची पाइपलाइन तिकडे तो भाड्याने घ्यायचा पत्र्याचा शेड; ४०० कोटी कमावले, शेवटी बिंग फुटलं!

googlenewsNext

गुजरातमधील सुरतमध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गुजरातसह देशातील अनेक राज्यांतील तेल कंपनीच्या पाइपलाइन फोडून सुमारे ४०० कोटी रुपयांचे तेल चोरणारा संदीप गुप्ता याला पोलिसांनी अटक केली आहे. सुरतच्या गुन्हे शाखेने आरोपी संदीप गुप्ता याला कोलकाता येथून अटक केली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये तेल चोरीचे नेटवर्क चालविणारा माफिया संदीप गुप्ता याच्या अटकेनंतर या खेळाशी संबंधित अन्य लोकांचीही माहिती मिळण्याची शक्यता आहे.

राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये तेल चोरीचा सूत्रधार संदीप गुप्ताविरुद्ध २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. संदीप गुप्ताविरुद्ध बिहारसह इतर अनेक राज्यांमध्ये तेल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. संदीप गुप्ताच्या अटकेबाबत सुरतचे पोलीस आयुक्त अजय कुमार तोमर म्हणाले की, संदीप गुप्ताविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. गुजरात आणि राजस्थान प्रकरणात अंतरिम जामीन घेऊन आरोपी फरार झाला होता. त्यानंतर सुरत गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती.

स्मशानभूमीत नेताना महिलेने अचानक उघडले डोळे; तो दिवस काढला, दुसऱ्या दिवशी...

राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये तेल चोरीचा सूत्रधार संदीप गुप्ताविरुद्ध २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. संदीप गुप्ताविरुद्ध बिहारसह इतर अनेक राज्यांमध्ये तेल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. संदीप गुप्ताच्या अटकेबाबत सुरतचे पोलीस आयुक्त अजय कुमार तोमर म्हणाले की, संदीप गुप्ताविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. गुजरात आणि राजस्थान प्रकरणात अंतरिम जामीन घेऊन आरोपी फरार झाला होता. त्यानंतर सुरत गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती.

संदीप गुप्ता यांनी दक्षिण गुजरातमध्ये फर्निश ऑइल खरेदी करून काळा धंदा सुरू केला. यानंतर तो तेल चोरांच्या संपर्कात आला. त्यानंतर, त्याने एक मोडस ऑपरेंडी तयार केली. ज्या अंतर्गत तो इंडियन ऑइल आणि ओएनजीसीची पाइपलाइन ज्या ठिकाणी असायच्या त्याच्याच जवळपास तो एखाद्या पत्र्याचा शेड भाड्याने घ्यायचा. 

आशियातील सर्वात श्रीमंत गाव भारतात; वर्षभर एकच फळ विकतात, डायरेक्ट करोडपती बनतात

पत्र्याचा शेड भाड्याने घेतल्यानंतर संदीप गुप्ता आणि त्याच्या टोळीचे लोक पाइपलाइनला छेद देऊन तेल चोरून ते टँकरमध्ये भरत असत. चोरीच्या माध्यमातून तीन- चार टँकरमध्ये तेल चोरुन भरत होते. गुजरात एटीएसनेही संदीप गुप्ताविरुद्ध गुजकीटोक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये तो फरार होता. सुरत पोलिस आयुक्तांनी संदीप गुप्ता याला अटक करणे हे सुरत पोलिसांचे मोठे यश असल्याचे म्हटले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Police have arrested Sandeep Gupta, who stole oil worth around Rs 400 crores by breaking pipelines of oil companies in many states of the country.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.