रुपेश मोरेला गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक; वसंत मोरेंची FB पोस्ट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 10:14 PM2023-03-07T22:14:43+5:302023-03-07T22:26:52+5:30

रुपेश मोरेला खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याचीही धमकी दिल्यामुळे पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

Police have arrested the accused who threatened to kill MNS leader Vasant More's son. | रुपेश मोरेला गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक; वसंत मोरेंची FB पोस्ट, म्हणाले...

रुपेश मोरेला गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक; वसंत मोरेंची FB पोस्ट, म्हणाले...

googlenewsNext

मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून ३० लाख रुपयांची खंडणी अज्ञातांनी मागितली होती. सोबतच खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याचीही धमकीही दिली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

रुपेश मोरेला खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याचीही धमकी दिल्यामुळे पुणेपोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली दरम्यान या प्रकरणी मुंबईतून एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी काही जण असण्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान पोलिसांना आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करत सद्रक्षणाय खलनिग्रहणाय...कानुन के हाथ बहुत लंबे होते है! धन्यवाद...भारती विद्यापीठ पोलीस, असं म्हटलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री अकरा वाजता, रुपेश मसंत मोरे, (वय २५ वर्षे, धंदा हॉटेल व्यवसाय, रा. कात्रज गावठाण) दैनंदिन काम उरकून घरी जात असतानाच अज्ञात मोबाईल वरुन हाँटस अप वर मेसेज आला होता. त्या मध्ये रुपेश यांचा एका मुलीसोबत विवाह झालेबाबतचे नोंदणीचे प्रमाणपत्राचा फोटो होता. व त्या खाली लिहिले होते. "हमने आपके नाम का मॅरेज सटीफिकेट बनाया है, खराडी ऑन आयटी पार्क के सामने इनोव्हा मे २० लाख रुपये रख देना, पोलीस कम्प्लेट किया और इनोव्हा सील हुआ तो देख लेना क्या करते है आपके साथ, और पुलीस कम्लेट करके कुछ नही होने वाला, इम्तीयाज चाचा ने पहीले से सब सेटींग करा है, पुरी चंदननगर पोलीस स्टेशन मॅनेज कर दी है." असा धमकीचा मेसेज होता. रुपेश यांनी त्याकडे ओके म्हणून दुर्लक्ष केले. त्यानंतर कोणाचा फोन व मेसेज आला नाही. मात्र त्यानंतर तुलाच पैसे देण्यासाठी यावेच लागेल असे सांगून त्या ने रुपेश ला दोन तीन दिवस वारंवार मेसेज करून त्रास दिल्या नंतर रुपेशने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती.

Web Title: Police have arrested the accused who threatened to kill MNS leader Vasant More's son.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.