वृद्ध नागरिकांना लुबाडणाऱ्या दोन अट्टल चोरांना पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 05:53 PM2020-12-22T17:53:41+5:302020-12-22T17:54:46+5:30

Arrest : सोन्याचे दागिने व दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्याची माहिती  पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.

Police have arrested two thieves for robbing senior citizens | वृद्ध नागरिकांना लुबाडणाऱ्या दोन अट्टल चोरांना पोलिसांनी केली अटक

वृद्ध नागरिकांना लुबाडणाऱ्या दोन अट्टल चोरांना पोलिसांनी केली अटक

googlenewsNext
ठळक मुद्देगणेश उर्फ सुभान संजय करावडे वय 31 राहणार निळजे डोंबिवली, साईनाथ प्रकाश गायकवाड वय 23 राहणार घाटकोपर अशी या चोरांची नाव आहेत.

ठाणे : केबल दुरुस्तीच्या बहाण्याने वृद्ध नागरिकांच्या घरात शिरून त्यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन अट्टल चोरांना ठाणे नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्याची माहिती  पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.

 गणेश उर्फ सुभान संजय करावडे वय 31 राहणार निळजे डोंबिवली, साईनाथ प्रकाश गायकवाड वय 23 राहणार घाटकोपर अशी या चोरांची नाव आहेत, ह्या दोघांपैकी करावडे हा अट्टल नीरढावलेला  चोर आहे, अशाच चोरीच्या केस मध्ये तो  अडीच वर्षांपासून जेल मध्ये होता,17 सप्टेंबर 2019 रोजी तो जमिनावर सुटला होता, त्या नंतर लोकडाऊन सुरु झाल्या मुळे त्याला काही करता येत नव्हते, पण नंतर त्याने परत चोरीचा धंदा सुरु केला, करावडे हा पहिला घाटकोपर येथे राहायला होता, त्यामुळे त्याची मैत्री साईनाथ गायकवाड बरोबर होती, आपल्या या चोरीच्या धंद्यामध्ये त्याने साईनाथला सुद्धा सामील करून घेतले, हे दोघेही मोटारसायकल वरून येऊन वृद्ध नागरिकांना टार्गेट करत असत, जास्त करून ज्याची मुलं परदेशी आहेत घरात वृद्ध दाम्पत्य एकटेच राहतात अशा सोसायट्यांना ते हेरायचे, नौपाड्या येथील काही  उच्चब्रू सोसायटी मध्ये जाऊन एकट्या दुकट्या राहणाऱ्या  वृद्ध नागरिकांच्या घरात घुसून मी  केबल वाला  आहे  तुमची केबल चेक करायला आलो आहे, असे सांगुन केबलची वायर काडून टाकायचा ,सेट टॉप बॉक्स मधील वायर खराब झाली आहे तिला घासायला सोन्याची तार  लागेल, पण ती नसेल तर तुमच्या कडची सोन्याची चैन किंवा सोन्याचा दागिना द्या वायर घासून तुम्हाला परत देतो असे सांगायचा, सोन दिल्या नंतर जरा पाणी द्या किंवा लांब जाऊन वायर पकडा असे सांगायचा  आणि त्यांना काही कळायच्या आधीच सोन घेऊन पसार व्हायचे,अशा प्रकारच्या  गुन्ह्याच्या तक्रारी नौपाडा परिसरात वाढल्या नंतर उपायुक्त अविनाश अंबूर, सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल मांगले, पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली  गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस उप निरीक्षक विनोद लबडे व त्यांच्या पथकाने अहोरात्र मेहनत करून या दोघांचा माग काढला, गणेश करावडे हा घरी राहायचा नाही कधी निळजेला तर कधी घाटकोपरला तर कधी मित्रा कडे असा फिरत राहायचा त्या मुळे तो सापडत नव्हता, पण पोलिसांनी मोठ्या सीताफिने त्याला अटक केली, त्या नंतर साईनाथ गायकवाडला  पकडण्यात आल, साईनाथ गायकवाड हा मोटारसायकल घेऊन खाली तयारी मध्ये उभा राहायचा, करावडे चोरी करून खाली आला की मोटारसायकल वर बसून हे दोघे पळून जायचे, त्यांच्या कडून पोलिसांनी 4,87,500/- रुपयाचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली 83,000/- रुपयाची होंडा मोटारसायकल, आणि नौपाडाच्या हद्दीतून चोरलेल्या 66,000/- बुलेट मोटारसायकल, आणि होंडा एव्हीएटर असा एकूण 6,30,500/- रुपयाचा माल जप्त केला आहे.

Web Title: Police have arrested two thieves for robbing senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.