पोलिसांची डोकेदुखी वाढली, व्यापारी दहशतीखाली; नांदेडात रिंदा गँग सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 02:20 AM2020-10-14T02:20:32+5:302020-10-14T02:20:55+5:30

दीड वर्षांपूर्वी शहरात एकाची गोळ्या घालून भरदिवसा हत्या केल्यानंतर रिंदा हे नाव पुढे आले. त्यानंतर व्यापारी, डॉक्टरांना खंडणीसाठी धमक्या देणे सुरू झाले.

Police headaches increased, traders panicked; Rinda gang active in Nanded | पोलिसांची डोकेदुखी वाढली, व्यापारी दहशतीखाली; नांदेडात रिंदा गँग सक्रिय

पोलिसांची डोकेदुखी वाढली, व्यापारी दहशतीखाली; नांदेडात रिंदा गँग सक्रिय

googlenewsNext

नांदेड : गेले काही महिने रिंदा च्या दहशतीतून मोकळा श्वास घेणाऱ्या नांदेडकराना पुन्हा एकदा रिंदा परत आल्याने धक्का बसला आहे. दोन दिवसांपूर्वी एका व्यापाºयाला दोघांनी रिंदाच्या नावे धमकी दिली होती. खरेच रिंदा परत आला की भुरटे त्याच्या नावाचा वापर करीत आहेत, हे पोलिसांना शोधावे लागणार आहे.

दीड वर्षांपूर्वी शहरात एकाची गोळ्या घालून भरदिवसा हत्या केल्यानंतर रिंदा हे नाव पुढे आले. त्यानंतर व्यापारी, डॉक्टरांना खंडणीसाठी धमक्या देणे सुरू झाले. पोलिसांनी या प्रकरणात मटका राजकीय नेते, पोलीस अधिकारी यांच्यासह ६० हून अधिक जणांवर कारवाई केली होती. त्यानंतर बंद झालेली खंडणी भुरट्या टोळीवाल्यांनी आता पुन्हा सुरू केली आहे. या टोळीतील एका प्रमुखाची काही दिवसांपूर्वी हत्या झाली आहे. तर दुसरा फरार आहे. त्याचा शोध सुरू असताना आता पुन्हा एकदा रिंदा परत आल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

कुठून येतात गावठी कट्टे ?
शहरात मिसरूड न फुटलेले आरोपी देशी कट्टे घेऊन फिरत असल्याचे आढळून आले आहे़नांदेड शेजारच्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि कर्नाटक इ. राज्यांतून अवघ्या दहा हजार रुपयात हे कट्टे आणले जात असल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे़

Web Title: Police headaches increased, traders panicked; Rinda gang active in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस