पोलीस निरीक्षक वेश्या अड्डयावर आढळला ग्राहक म्हणून अन् छापेमारीत झाली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 13:24 IST2021-01-29T13:23:28+5:302021-01-29T13:24:04+5:30
Raid Of police : पोलिसांनी हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादव, शिवाजी वाघले, अरूण देवकर आणि सत्यजीत पंडीत यांना अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक वेश्या अड्डयावर आढळला ग्राहक म्हणून अन् छापेमारीत झाली अटक
सांगली : शहरातील कर्नाळ रोडवर असलेल्या हॉटेल रणवीरमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्या अडडा सांगली ग्रामीण पोलिसांनी उध्वस्त केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरूण देवकर यांच्यासह सहाजणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक देवकर हे ग्राहक म्हणून अड्ड्यावर पोलिसांना आढळून आले.
...अन् एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णाने घेतला पोलिसाच्या हाताला चावा
पोलिसांनी हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादव, शिवाजी वाघले, अरूण देवकर आणि सत्यजीत पंडीत यांना अटक केली आहे.कर्नाळ येथील हॉटेल राजवीरमध्ये वेश्या अड्डा सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण पोलिसांच्या मदतीने या पथकाने हॉटेलवर छापा टाकला असता, दोन पिडीत महिलांसह सहाजण होते. यातील एक आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवकरही होते. वेश्या अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात पोलीस निरीक्षकच आढळून आल्याने खळबळ माजली आहे. रात्री उशिरा सांगली ग्रामीण पोलिसात सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.