पाेलीस निरीक्षक सापळ्यात अडकला; एक लाख रूपयांची लाच घेताना अटक
By दिगांबर जवादे | Published: September 5, 2022 07:42 PM2022-09-05T19:42:04+5:302022-09-05T19:43:34+5:30
अहेरी येथील घटना, ट्रान्सपाेर्ट व्यावयायिकाची तक्रार
आलापल्ली (गडचिराेली): ट्रान्सपाेर्ट व्यावसायिकाकडून एक लाख रूपयांची लाच स्विकारतांना अहेरी पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरक्षक श्याम गोविंदराव गव्हाणे याला एसीबीच्या पथकाने एक लाख रूपयांची लाच स्विकारताना अटक केली आहे. ही कारवाई साेमवारी अहेरी पाेलीस स्टेशनच्या आवारात करण्यात आली.
तक्रारदार हे नागेपल्ली येथील रहिवासी असून त्यांचा ट्रान्सपाेर्टचा व्यवसाय आहे. ट्रान्सपाेर्टचे वाहन सुरळीत चालू देण्याकरिता श्याम गव्हाने याने तक्रारदाराकडून एक लाख रूपयांची मागणी केली हाेती. मात्र लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदारने याबाबतची तक्रार नागपूर एसीबीकडे केली. त्यानुसार साेमवारी सापळा रचण्यात आला. गव्हाने याने सांगीतल्यानुसार तक्रारदार यांनी लाचेची रक्कम पाेलीस स्टेशनच्या आवारात उभ्या असलेल्या शासकीय वाहनामध्ये ठेवली. काही वेळानंतर गव्हाने याने रक्कम आपल्या ताब्यात घेतली. अगाेदरच सापळा रचलेल्या एसीबीच्या पथकाने गव्हाने याला रकमेसह पाेलीस स्टेशनच्या आवारातच रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरच्या पाेलीस निरिक्षक शिल्पा भरडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.