पॉर्नोग्राफीप्रकरणी शर्लिन चोप्राची पोलीस चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 07:45 AM2021-08-07T07:45:28+5:302021-08-07T07:45:57+5:30

Sherlyn Chopra: पॉर्नोग्राफी प्रकरणात गुन्हे शाखेने अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिची शुक्रवारी चौकशी केली. यावेळी महत्त्वाची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागल्याचे समजते आहे. चौकशीनंतर तिला सोडून देण्यात आले आहे.  

Police interrogate Sherlyn Chopra in pornography case | पॉर्नोग्राफीप्रकरणी शर्लिन चोप्राची पोलीस चौकशी

पॉर्नोग्राफीप्रकरणी शर्लिन चोप्राची पोलीस चौकशी

googlenewsNext

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात गुन्हे शाखेने अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिची शुक्रवारी चौकशी केली. यावेळी महत्त्वाची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागल्याचे समजते आहे. चौकशीनंतर तिला सोडून देण्यात आले आहे.   
मालमत्ता कक्षाने या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यासह  ११ जणांना अटक केली आहे. शर्लिननेही अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, गेल्या आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.  
मालमत्ता कक्षाने समन्स बजावून तिला हजर राहण्यास सांगितले. दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास ती हजर झाली.  या प्रकरणात कुंद्रा आणि तिचे व्हॉट्सॲप चॅट व्हायरल झाले होते. यात ५०-५० टक्के व्यवहाराचाही उल्लेख होता. तो नेमका कशाबद्दल? तिचा यात सहभाग आहे का? याची चौकशी करण्यात आली.   
शर्लिनने राज कुंद्राविरोधात एप्रिल २०२१मध्ये लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोप करुन गुन्हा दाखल केला होता. एका टेक्स्ट मेसेजवरून त्यांच्यात वाद झाला होता. नंतर घरी धडकलेल्या कुंद्राने आपल्यावर जबरदस्ती केली असता विवाहित पुरुषात अडकायचे नाही, हे त्याला स्पष्टपणे सांगितल्याचे  तिने म्हटले होते. 

Web Title: Police interrogate Sherlyn Chopra in pornography case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.