विवाहबाह्य संबंधातून पोलिसाने केली महिलेची हत्या, कारमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 08:14 PM2022-06-15T20:14:37+5:302022-06-15T20:26:06+5:30
Extra Marital Affairs Case : हिललाईन पोलिसांनी याप्रकरणी पोलिस खाजेकर यांच्यासह साल्यास अटक केली असून अधिक तपास करीत आहेत.
सदानंद नाईक
उल्हासनगर : पैशाची मागणी व अवैध संबंधातून ठाणे पोलीस मुख्यालयातपोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या सचिन खाज जेकर याने साल्याच्या मदतीने महिलेची हत्या करून विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह व्हेग्नार कारमध्ये ठेवल्याचा प्रकार उघड झाला. हिललाईन पोलिसांनी याप्रकरणी पोलिस खाजेकर यांच्यासह साल्यास अटक केली असून अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिसांना मिर्ची ढाबा जवळील व्हेग्नार कारमध्ये एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. मात्र मिर्ची ढाब्याची हद्द हिललाईन पोलीस ठाण्याचत येत असल्याने, हिललाईन पोलिसाना माहिती दिल्यावर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान बातमीदाराच्या माहितीनुसार शेजारील ढाब्यावर पोलिसांनी चौकशी केली असता, महिलेचा गळा दाबून ठार मारणारा व ठाणे पोलीस मुख्यालयात पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेला सचिन खाजेकर व त्याचा साला कल्पेश खैरनार मिळून आला. हिललाईन पोलिसांनी त्यांना बुधवारी सकाळी ताब्यात घेऊन बोलते केलेअसता, आशा मोरे नावाच्या महिले सोबत खाजेकर याचे अनैतिक संबंध असून पैशाच्या मागणीसह तिच्याकडेच राहण्याचा तगादा लावल्याने, खुनासारखा गुन्हा घडला आहे.
साफसफाई करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; परराज्यातून केले अटक
औरंगाबाद येथील राहणारी असलेल्या आशा मोरे नावाच्या महिलेच्या पैशे व तिच्याकडे राहण्याच्या तगाद्याला कंटाळून सचिन खाजेकर याने महिलेला ढाबा परिसरात १४ जूनच्या पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास आणले. दरम्यान साला कल्पेश खैरनार याच्या मदतीने महिलेचा गळा खाजेकर याने दाबून तीचा खून केला. तसेच महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी उभी असलेल्या व्हग्नार कार मध्ये मृतदेह ठेवला. मात्र बातमीदाराने दिलेल्या माहितीमुळे खरे गुन्हेगार काही तासात गजाआड झाले. याबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. हिललाईन पोलिसांनी सचिन खाजेकर व कल्पेश खैरनार यांना अटक केली असून अधिक तपास करीत आहेत.