डान्स शोमध्ये बोलावून पैसे लुटणाऱ्या अभिनेत्रीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 16:46 IST2018-11-29T16:44:53+5:302018-11-29T16:46:23+5:30

अहमदाबाद पोलिसांकडे या अभिनेत्रीच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास केल्यानंतर या अभिनेत्रीचा खरा चेहरा समोर आला आहे. संजना या अभिनेत्रीचं नाव आहे. 

The police locked up the actress in a dance show | डान्स शोमध्ये बोलावून पैसे लुटणाऱ्या अभिनेत्रीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

डान्स शोमध्ये बोलावून पैसे लुटणाऱ्या अभिनेत्रीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

ठळक मुद्देलुटणाऱ्या संजना या अभिनेत्रीला अहमदाबाद पोलिसांनी अखेर जेरबंद केले अहमदाबाद पोलिसांकडे या अभिनेत्रीच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्यासंजनाचे लग्न झाले होते व ती सध्या पतीपासून विभक्त राहत होती.

अहमदाबाद - तरुणांना डान्स शोमध्ये बोलावून त्यांना लुटणाऱ्या संजना या अभिनेत्रीला अहमदाबाद पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. ही अभिनेत्री लोकांना तिच्या डान्स शोमध्ये बोलवत असे आणि त्यांच्याशी लगट करायची. नंतर त्याचा व्हिडिओ शूट करायची व नंतर तो व्हिडिओ दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी करायची तक्रादारांनी आरोप आहे. 

अहमदाबाद पोलिसांकडे या अभिनेत्रीच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास केल्यानंतर या अभिनेत्रीचा खरा चेहरा समोर आला आहे. संजना असं या अभिनेत्रीचं नाव आहे. संजना बऱ्याच दिवसांपासून बेरोजगार होती. म्हणून तिने पैसे कमावण्यासाठी डान्स शो सुरू केला. या डान्स शोमध्ये ती लोकांशी लगट करत अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांना लुटायची. या कामात तिला तिचा बॉयफ्रेंड सय्यद मोईन अलीची मदत मिळत होती. संजनाचे लग्न झाले होते व ती सध्या पतीपासून विभक्त राहत होती. रामोल येथे राहणाऱ्या संजनाची ओळख सय्यद मोईन अलीसोबत झाली. नंतर हे दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. 

Web Title: The police locked up the actress in a dance show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.