राज्यपालांच्या हस्ते विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांना पदकं प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 09:17 PM2019-07-25T21:17:02+5:302019-07-25T21:20:36+5:30
राज्य पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ही पदकं प्रदान करण्यात आली.
मुंबई - राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक, राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण, विशेष कामगिरीसाठी पोलीस पदक मिळालेल्या राज्य पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ही पदकं प्रदान करण्यात आली. राज्य पोलीस मुख्यालयात झालेल्या या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आदी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद विरोधी कारवाई केल्याबद्दल घोषित राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकांचे आणि उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक व पोलीस पदके राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्यादिवशी घोषित करण्यात आली होती. या पदकांचे वितरण राज्यपालांच्या हस्ते व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यामधील हिक्केर जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहिद झालेल्या दोगे डोलू आत्राम व स्वरुप अशोक अमृतकर यांना मरणोत्तर शौर्यपदक जाहीर झाले. या शहिदांच्या कुटुंबियांना पदके प्रदान करण्यात आली.
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते व मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक, राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रदान. गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आणि दीपक केसरकर उपस्थित pic.twitter.com/3AFByJf1i7
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 25, 2019