पोलिसाने केला अल्पवयीन तरुणीचा विनयभंग, न्यायालयीन कोठडीत रवानगी; सेवेतून निलबंन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 03:25 PM2021-08-21T15:25:25+5:302021-08-21T15:25:53+5:30

Crime News: डोंबिवली रानगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सतीश कार्ले या पोलिसाने एका अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

Police molested minor, remanded in police custody | पोलिसाने केला अल्पवयीन तरुणीचा विनयभंग, न्यायालयीन कोठडीत रवानगी; सेवेतून निलबंन

पोलिसाने केला अल्पवयीन तरुणीचा विनयभंग, न्यायालयीन कोठडीत रवानगी; सेवेतून निलबंन

Next

कल्याण-डोंबिवली रानगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सतीश कार्ले या पोलिसाने एका अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. कार्लेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. विनयभंग प्रकरणी पोलिस उपायुक्तांनी कार्लेला सेवेतून निलंबित करण्याची कारवाई केली आहे. (Police molested minor, remanded in police custody)
डोंबिवलीतील एका इमारतीत राहणा:या अल्पवयीन तरुणीने तिचा विनयभंग पोलिस सतीश कार्ले याने केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. तरुणी इमारतीचा जिना चढत असताना तिच्या विनयभंग कार्लेने केल्याचा आरोप तरुणीने केला. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीच्या आधारे कार्लेच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ज्या पोलिस ठाण्यात कार्ले कार्यरत होता. त्याच पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. कार्लेच्या या कृत्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेस काळीमा फासला गेला आहे.

Web Title: Police molested minor, remanded in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.