Pushpa स्टाईलमध्ये करत होते रक्तचंदनाची तस्करी; ५५ मजुरांसह ३ तस्करांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 03:47 PM2022-01-25T15:47:16+5:302022-01-25T15:47:31+5:30

कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर मजुरांकडून दगडफेक; कुऱ्हाडीने हल्ला

Police nab 3 sandalwood smugglers, 55 woodcutters after 'Pushpa' like chase in Nellore | Pushpa स्टाईलमध्ये करत होते रक्तचंदनाची तस्करी; ५५ मजुरांसह ३ तस्करांना बेड्या

Pushpa स्टाईलमध्ये करत होते रक्तचंदनाची तस्करी; ५५ मजुरांसह ३ तस्करांना बेड्या

Next

नेल्लोर: आंध्र प्रदेशातील रक्तचंदनाच्या होणाऱ्या तस्करीवर आलेला अल्लू अर्जुनचा पुष्पा सिनेमा प्रचंड गाजत आहे. अल्लू अर्जुनचा अभिनय, त्याचे डायलॉग्स, चित्रपटातील गाणी यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. पुष्पा सिनेमा रक्तचंदनाच्या तस्करीवर बेतलेला आहे. रक्तचंदनाच्या तस्करी रोखण्यासाठी सुरू असलेले पोलिसांचे प्रयत्न, त्यांच्यावर कुरघोड्या करून पुष्पा करत असलेली तस्करी, पोलिसांकडून सुरू असलेला तस्करांचा पाठलाग या चित्रपटाच्या कथानकाचा गाभा. पुष्पा चित्रपटासारखीच घटना आंध्र प्रदेशच्या नेल्लोरमध्ये घडली आहे.

पुष्पा स्टाईल तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राखीव जंगलात असलेल्या रक्तचंदनाची झाडं कापणाऱ्या ५५ मजुरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच ३ तस्करांनादेखील गजाआड करण्यात आलं आहे. रापूरच्या जंगलातून पोलिसांनी तस्करांना बेड्या ठोकल्या. 

पोलिसांनी लाकूड तोडणारे मजूर आणि तस्करांना पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी पोलिसांवर दगडांनी आणि कुऱ्हाडींनी हल्ला चढवला. वाहनांच्या मदतीनं तिथून पळण्याचा प्रयत्नदेखील मजुरांनी केला. मात्र पोलिसांनी ५५ मजुरांना आणि ३ तस्करांना पकडलं.

अटकेत असलेला मुख्य तस्कर वेलोर दामू हा चित्तूर जिल्ह्याच्या विबीपुरम क्षेत्राचा रहिवासी असल्याची माहिती नेल्लोरचे एसपी विजया राव यांनी दिली. तो पुद्दुचेरीच्या कुपन्ना सुब्रमण्यमच्या संपर्कात होता. दामूचा मेहुणा राधाकृष्णनदेखील तस्करी करतो. तस्कर २० जानेवारीला नेल्लोर जिल्ह्यातल्या गुडूरला पोहोचले. त्यांनी रापूरच्या जंगलात असलेली रक्तचंदनाची झाडं कापली.

Web Title: Police nab 3 sandalwood smugglers, 55 woodcutters after 'Pushpa' like chase in Nellore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.