नागपाड्यातील आंदोलकांना पोलिसांच्या नोटीसा जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 09:23 PM2020-02-03T21:23:33+5:302020-02-03T21:24:48+5:30

काहींना तोंडी सूचना दिल्या तर काहींना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. 

Police notice issued to protesters in Nagpada | नागपाड्यातील आंदोलकांना पोलिसांच्या नोटीसा जारी

नागपाड्यातील आंदोलकांना पोलिसांच्या नोटीसा जारी

Next

मुंबई - मुंबईपोलिसांनी भा. दं. वि. कलम १४९ अन्वये नागपाड्यात CAA, NRC, & NPR विरोधात आंदोलनात सामील झालेल्यांना नोटिसा धाडल्या असल्याची माहिती नागपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक शालिनी शर्मा यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले की, काहींना तोंडी सूचना दिल्या तर काहींना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. 

नागपाड्यात ‘सीएए’विरोधात आंदोलन; महिलांचा वाढता प्रतिसाद

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (CAA) नागपाडा येथे रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या महिलांच्या आंदोलनाला वाढता प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मुंबईच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने महिला येथे आंदोलनासाठी येऊ लागल्या आहेत. अन्यायकारी कायदा मागे घेतला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्यात येईल, असा निर्धार महिलांनी केला आहे. देशातील ज्या राज्यांनी या कायद्याविरोधात संबंधित विधानसभांमध्ये ठराव मंजूर केला आहे. त्याप्रमाणे, महाराष्ट्रातदेखील महाविकास आघाडीने या कायद्याविरोधात ठराव मंजूर करून केंद्र सरकारला पाठविण्याची मागणी करण्यात आली. राज्य सरकारच्या अनेक मंत्र्यांनी या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नाही, हे स्पष्ट केले असले, तरी त्यासाठी अधिकृत ठराव करण्याची मागणी केली जात आहे. महिला घर चालवत आहेत व या कायद्याच्या विरोधात लढा उभारून देश वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत या आंदोलनात सहभागी झालेल्या कायद्याच्या विद्यार्थिनी फातमा जोहरा यांनी व्यक्त केले होते.

Web Title: Police notice issued to protesters in Nagpada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.