मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी धाडल्या नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 09:27 PM2019-08-21T21:27:45+5:302019-08-21T21:29:45+5:30
मुंबई पोलिसांनी फौ. द. प्र. स. कलम १४९ अन्वये नोटीस बजाविल्या आहेत.
मुंबई - कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या अंमलबाजवणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी होणार असल्याने दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात जेथे ईडीचे कार्यालय आहे तेथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना उपस्थित न रहाण्यासाठी मुंबई पोलिसांनी फौ. द. प्र. स. कलम १४९ अन्वये नोटीस बजाविल्या आहेत. या नोटिशीत उद्या कोणत्याही कृत्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास संबंधित व्यक्तीस जबाबदार धरून आपणाविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे.
पालघर येथील सक्रिय मनसैनिक तुलसी जोशी, दादर येथील मनसे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार, रिटा गुप्ता, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना नोटीस धाडण्यात आली आहे. तसेच मनसे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून आम्ही मनसैनिक उद्या चौकशीदरम्यान ईडीला संपूर्ण सहकार्य करत आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेला कोणतीही बाधा आणणार नसल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.
Police have served notices under section 149 of the Criminal Procedure Code (CrPC) to Maharashtra Navnirman Sena (MNS) workers in Pune. Enforcement Directorate has summoned MNS Chief Raj Thackeray (in file pic) in connection with IL&FS case. pic.twitter.com/0g3BP6z83i
— ANI (@ANI) August 21, 2019