मनसे आमदारांसह कल्याण डोंबिवलीतील ४५ कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 08:20 PM2022-05-03T20:20:16+5:302022-05-03T21:25:27+5:30

Police issued notices to MNS karyakrtas : कायदा व्यवस्था बिघडून नये यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी बजावलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे.

Police notice to 45 activists from Kalyan Dombivali including MNS MLAs | मनसे आमदारांसह कल्याण डोंबिवलीतील ४५ कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटिसा

मनसे आमदारांसह कल्याण डोंबिवलीतील ४५ कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटिसा

Next

कल्याण - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेच्या पश्चात पोलिसांनीमनसे आमदार राजू पाटील यांच्यासह कल्याण डोंबिवलीतील ४५ मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. आमदारांना मनाई आदेशाचा भंग न करण्याच्या नोटिसा पाठविली आहे. तर ज्या पदाधिकारी कार्यकत्र्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात यापूर्वी दखल पात्र गुन्हे दाखल आहे. त्यांच्याकडून एक वर्षाकरीता हमीपत्र (बॉण्ड ) लिहून मागितला आहे. कायदा व्यवस्था बिघडून नये यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी बजावलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे.

आमदारांना बजावलेल्या नोटिसमध्ये त्यांनी जमाव जमवून नये. धार्मिक स्थळापासून 2क्क् मीटरच्या अंतरात रॅली, मिरवणूक काढून ध्वनीक्षेपकाचा वापर करु नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. तर मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या विरोधात पोलिसानी नोटिस बजावली आहे. घरत यांच्या विरोधात यापूर्वीच 4 दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने त्यांनी एक वर्षाचे हमीपत्र पोलिसांना लिहून द्यावे. त्यात उत्पन्न आणि मालमत्तेचा तपशीलही नमूद करावा. तसेच त्यासाठी प्रतिष्ठीत व्यक्तीची हमी द्यावी लागेल. त्या व्यक्तीचे उत्पन्न आणि मालमत्ता याचाही तपशील नोंद केलेला असावा असे म्हटले आहे.

कालच कल्याणच्या मुस्लिम समाज स्ट्रस्टने मशीदीवरील भोंगे उतरविणार नाही. आवाजाची मर्यादा पाळली जाईल असे स्पष्ट केले आहे. तसेच पोलिस प्रशासना आमचा विश्वास आहे असे म्हटले होते. त्यानंतर आज पोलिसांनी मनसे आमदारांसह कार्यकर्त्यांना नोटिस बजावल्या आहेत. आमदार आणि कार्यकर्त्यांकडून शांततेचा भंग केला जाण्याची शक्यतेची खबरदारी घेत पोलिसांनी या नोटिसा बजावल्या आहेत. मात्र मनसे आमदार आणि कार्यकर्त्यांनी आम्ही दबावाला बळी पडणार नाही. पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचा आम्हाला आदेश आहे. त्यापूर्वी कायदा राबविणा:यांनी नियम न पाळणा:यांच्या विरोधात कारवाई करण्याऐवजी आमची मुस्काटदाबी सुरु केली आहे. पोलिसांनी धाडलेल्या नोटिसाला वकिलामार्फत उत्तर देणार असल्याचे सांगितले. अनेक कार्यकर्त्यांना आज दुपारीच १ वाजता हजर राहून बा’ंड लिहून देण्याचे पोलिसांनी सांगितले होते. कार्यकर्ते बा’ण्ड लिहून देम्यास देण्यास गेलेच नाहीत. त्यामुळे पोलिस यापूढे काय कारवाई करतात हा देखील महत्वाचा मुद्दा ठरणार आहे.

Web Title: Police notice to 45 activists from Kalyan Dombivali including MNS MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.