कल्याणच्या विजय तरुण मंडळाच्या गणपती देखाव्यास पाेलिसांची नोटीस
By मुरलीधर भवार | Published: September 19, 2023 03:43 PM2023-09-19T15:43:17+5:302023-09-19T15:48:07+5:30
६० वर्षांपासून विजय तरुण मंडळ साजरं करतंय गणेशोत्सव
मुरलीधर भवार-कल्याण: लोकशाहीचे चारही खांब प्रचंड दबावाखाली आहेत. दिल्लीश्वर म्हणजे भाजपकडून दबाव टाकला जात आहे. विधीमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे यांच्यावर कसा दबाव टाकला जात आहे. हा देखावा कल्याणमध्ये विजय तरुण मित्र मंडळाने साकारण्यात आला आहे. या मंडळाचे विश्वस्त विजय साळवी हे आहेत. त्याचबरोबर ते शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत.
कल्याणमधील विजय तरुण मंडळ हे ६० वर्षापासून गणेशोत्सव साजरे करते. त्यांचे विषय हे समाज प्रबोधनात्मक आणि ताज्या घडामोडींवर आधारीत असतात. गेल्या वर्षी शिवसेनेतील पडलेल्या फूटीवर देखाावा साकारण्यात आला होता. या देखावाचा वाद उच्च न्यायालयात गेला होता. काही आपेक्षार्ह बाबी वगळून हा देखावा साकारला गेला होता. यावर्षीही या मंडळाकडून भारतात लोकशाहीची गळचेपी होत आहे. हे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
याबाबत मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी सांगितले की, दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या विषयावर सजावट करतो. जो विषय ताजा असतो. त्यावर आधारीत ही सजावट असते. लोकशाहीचे चार खांब आहेत. त्यांच्यावर प्रचंड प्रेशर टाकले जाते. त्यामुळे ते योग्य न्याय देऊ शत नाहीत. या देखाव्यातून आम्ही असे दाखविले आहे की, भारतीतील लोकशाही ही एका दबाव तंत्रात आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. स्वीडनने एक सर्वे केला होता. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले होते की, भारतातील लोकशाही ही धोक्यातआली आहे. यामध्ये चार काम दाखविले आहेत. विधीमंडळ, कार्यकापालिका, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे हे चार खांब कसे दाबले जात आहे. हे सांगितले आहे. सध्या जे भाजपचे सरकार आहे. ते पूर्ण लोकशाही दाबून टाकत आहे. हूकूमशाही पद्धतीने काम करीत आहे. या प्रकरणात पोलिसांनी मंडळाला १४९ नोटिस पाठविली आहे. तूम्ही जे काही निदर्शनास आणून दिले आहे. त्याच्या पासून काही गटामध्ये द्वेष झाले तर मंडळ जबाबदार असेल. पोलिसांचे असे म्हटले असेल तरी आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करणार.