नोकरीचे आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्याने केला बलात्कार, अश्लिल व्हिडीओ दाखवून केले ब्लॅकमेल, नॅशनल अ‍ॅथलिटचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 12:19 PM2021-06-04T12:19:30+5:302021-06-04T12:20:48+5:30

Crime News: एका पोलिस अधिकाऱ्याने सरकारी नोकरीचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा तसेच अश्लिल व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप राष्ट्रीय पातळीवरच्या एका महिला अ‍ॅथलिटने केला आहे. 

Police officer raped by showing job lure, blackmailed by showing pornographic videos, serious allegations of national athlete | नोकरीचे आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्याने केला बलात्कार, अश्लिल व्हिडीओ दाखवून केले ब्लॅकमेल, नॅशनल अ‍ॅथलिटचा गंभीर आरोप 

नोकरीचे आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्याने केला बलात्कार, अश्लिल व्हिडीओ दाखवून केले ब्लॅकमेल, नॅशनल अ‍ॅथलिटचा गंभीर आरोप 

Next

लुधियाना - पंजाबमधील लुधियाना येथून बलात्काराची एक धक्कादायक घटना घडली आहे. (Crime News)येथील एका पोलिस अधिकाऱ्याने सरकारी नोकरीचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा तसेच अश्लिल व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप राष्ट्रीय पातळीवरच्या एका महिला अ‍ॅथलिटने केला आहे. (Police officer raped by showing job lure, blackmailed by showing pornographic videos, serious allegations of national athlete)

 पोलिस अधिकाऱ्यावर झालेल्या या आरोपांमुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. पीडित महिला राष्ट्रीय वेटलिफ्टर असून, तिने पोलीस कमिश्नरांकडे दाद मागितली आहे. वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेने सांगितले की, पोलीस अधिकाऱ्याने तिला स्पोर्ट्स कोट्यामधून सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर नोकरीसंबंधी बोलण्याच्या बहाण्याने तो तिला वारंवार हॉटेलमध्ये बोलावत असे. तसेच तिच्यावर बलात्कार करत असे. 

एवढेच नाही तर पीडितेने सांगितले की, पोलीस अधिकाऱ्याने तिचा एक अश्लिल व्हिडीओसुद्धा बनवला होता. तो व्हिडीओ दाखवून हा अधिकारी तिला ब्लॅकमेल करत असे. तसेच वारंवार बलात्कार करत असे. 
 
आता पोलीस कमिश्नरांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसेच एखा महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पोलिसांवर झालेल्या गंभीर आरोपांबाबत एडीसीपी प्रज्ञा जैन यांनी सांगितले की, आता हे प्रकरण समोर आले आहे. मात्र आतापर्यंत आरोपांना दुजोरा मिळू शकलेला नाही. या हिला खेळाडूने केलेल्या आरोपांचा आधी तपास केला जाईल. तसेच ते खरे असल्याचे सिद्ध झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. 

Web Title: Police officer raped by showing job lure, blackmailed by showing pornographic videos, serious allegations of national athlete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.