पोलीस अधिकाऱ्याने घेतली १ हजाराची लाच अन् फसला एसीबीच्या जाळ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 03:04 PM2019-08-23T15:04:05+5:302019-08-23T15:06:40+5:30

एक हजार घेताना रंगेहात पकडल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) दिली.

Police officer taken 1 thousand bribe and trapped in ACB trap | पोलीस अधिकाऱ्याने घेतली १ हजाराची लाच अन् फसला एसीबीच्या जाळ्यात 

पोलीस अधिकाऱ्याने घेतली १ हजाराची लाच अन् फसला एसीबीच्या जाळ्यात 

Next
ठळक मुद्देसहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप सुरेश बोराडे (३४) याला शुक्रवारी सकाळी ९ वाजता ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्यातील ९ हजार रुपये बोराडे याने घेतल्यानंतर याप्रकरणी तक्रारदाराने २० ऑगस्ट रोजी ठाणे एसीबीत तक्रार केली होती.

ठाणे -  तक्रारदाराविरुध्द पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात (एनसी)  कारवाई न करण्यासाठी तसेच यापुढे सहकार्य करण्याकरिता एक हजारांची लाच घेताना कोलसेवाडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप सुरेश बोराडे (३४) याला शुक्रवारी सकाळी ९ वाजता ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. 
४५ वर्षीय तक्रारदार यांच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोराडे याने करवाई न करण्याकरिता सुरूवातीला २० हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती १० हजार देण्याचे ठरले. त्यातील ९ हजार रुपये बोराडे याने घेतल्यानंतर याप्रकरणी तक्रारदाराने २० ऑगस्ट रोजी ठाणे एसीबीत तक्रार केली होती. त्यानुसार २२ ऑगस्ट रोजी पडताळणी करत आज सापळा रचून बोराडे याला एक हजार घेताना रंगेहात पकडल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) दिली.

Web Title: Police officer taken 1 thousand bribe and trapped in ACB trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.