बंदी असून देखील काशीमिऱ्यात छमछम; पोलिसांनी टाकलेल्या धाडीत बार कर्मचारी आणि ग्राहकांसह १९ जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 06:24 PM2021-05-08T18:24:25+5:302021-05-08T18:24:58+5:30

Police Raid on Dance Bar in Kashimira :

 Police Raid on Dance Bar in Kashimira, Police arrested 19 people, including bar staff and customers | बंदी असून देखील काशीमिऱ्यात छमछम; पोलिसांनी टाकलेल्या धाडीत बार कर्मचारी आणि ग्राहकांसह १९ जणांना अटक 

बंदी असून देखील काशीमिऱ्यात छमछम; पोलिसांनी टाकलेल्या धाडीत बार कर्मचारी आणि ग्राहकांसह १९ जणांना अटक 

googlenewsNext

मीरारोड - कोरोनाने एकीकडे हाहाकार माजवला असताना लॉकडाऊन असून देखील काशीमिरा येथील एका ऑर्केस्ट्रा बार मध्ये चक्क आंबटशौकीन ग्राहकांची मैफिल रंगली . बंदी असून देखील शनिवारी पहाटे बार मध्ये कोरोनाचे नियम झुगारून मानसी बार मध्ये दिलबर ... दिलबर ... ह्या गाण्यावर अश्लील डान्स व नोटांची उधळण सुरू होती . तोच पोलिसांनी धाड टाकून ग्राहक व बार कर्मचारी असे एकूण १९ जणांना अटक करून बारच्या २ मालक - चालकांवर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे . (Police Raid on Dance Bar in Kashimira, Police arrested 19 people, including bar staff and customers)

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने फैलावत असल्याने शासनाने हॉटेल - बार वर सुद्धा बंदी घातलेली आहे . तसे असताना काशीमीराच्या मीरा गाव नाका येथील मानसी बार मध्ये चक्क नाचगाणी चालत असल्याची माहिती काशीमीराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांना मिळाली. हजारे यांनी  सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र भामरे सह राजेश पानसरे , दिनकर कोल्हे, जयदीप बडे, जयकुमार राठोड, अनिल नागरे, स्वाति देठे असे पथक शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास मानसी बार वर कारवाईसाठी पाठवले . पथकाने बारच्या मागील दरवाजाने आत प्रवेश केला असता तेथे दिलबर...  दिलबर ... ह्या गाण्यावर बारबाला अश्लील नृत्य करत होत्या तर ग्राहक नोटा उडवत होते . पोलिसांच्या पथकास पाहून सर्वांची झिंग उतरली . 

बारच्या ६ कर्मचाऱ्यांसह १३ ग्राहक अशा १९ जणांना पोलिसांनी अटक केली . तर बार मध्ये सापडलेल्या ६ बारबाला व १ तृतीयपंथी यांची सुटका करण्यात आली . यापैकी ४ बारबालाना तर एका लहानश्या गुप्त खोलीत लपवून ठेवण्यात आले होते . 

पोलिसांनी अटक १९ जणांसह बारचा मालक रवी शेट्टी आणि श्याम कोरडे अश्या एकूण २१ जणां विरुद्ध विविध कलमां खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अटक बार कर्मचारीत  विशाल पाठक, तिमआप्पा जोगी उर्फ महेशअण्णा, गोपाल गौडा, श्रीनिवास गौडा, रितेश सोनी, डाबोर सियाल यांचा समावेश आहे . 

तर  अटक केलेले आंबटशौकीन ग्राहक हे मुंबईच्या विलेपार्ले , कांदिवली , अंधेरी ,  माटुंगा , एल्फिस्टन तसेच ठाणे भागातील राहणारे आहेत.  आशिष जोशी, शैलेश झगडे, सुभाष झा, चिराग शाह, मयूर दाभोळकर, परेश मुजिंदरा, मौलिक शाह, जिग्नेश शाह, देविशंकर यादव, प्रकाश गनावत, रुपेश राठोड, भावेश पारेख, राजेश घारे अशी अटक ग्राहकांची नावे आहेत .  

बार मधून १ लाख ९१ हजारांची रोकड , दारूच्या बाटल्या आणि यंत्र साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे . बंदी असून देखील कोरोना संसर्ग पसरेल याची तमा न बाळगता डान्स बार चालवला जात असल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे . या प्रकरणी बारवाल्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे . 

Web Title:  Police Raid on Dance Bar in Kashimira, Police arrested 19 people, including bar staff and customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.