IPL वर सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोघे ताब्यात, एक फरार

By अनिल गवई | Published: April 14, 2023 01:50 PM2023-04-14T13:50:50+5:302023-04-14T13:51:15+5:30

रोख रकमेसह साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Police raid IPL betting den in Buldhana two arrested, one absconding | IPL वर सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोघे ताब्यात, एक फरार

IPL वर सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोघे ताब्यात, एक फरार

googlenewsNext

अनिल गवई, (खामगाव, जि. बुलढाणा): आयपीएलच्या सट्याचे प्रमुख केंद्र असलेल्या खामगावात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी रात्री छापा टाकला. याठिकाणी किंग ११ पंजाब आणि गुजरात टायटन सामन्यादरम्यान ऑनलाईन सट्टा खेळविणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तर एक जण फरार झाला. आरोपीकडून सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे आयपीएलच्या सट्यासाठी प्रसिध्द असलेल्या तब्बल २० पेक्षा अधिक बुकीमध्ये खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पोलीसांत दाखल तक्रारीनुसार, खामगाव-नांदुरा रोडवरील जलंब पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिहानी कोल्ड स्टोरेज जवळ आयपीएल सामन्यावर ऑनलाइन जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक स्थानिग गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीसांनी सापळा रचून कारवाई केली असता, सादीक मोबीन शेख वय ३० रा. पोस्टेनांदुरा जवळ,नांदुरा समीर अन्न्वर पटेल वय २५ रा. डागा पेट्रोलपंपाजवळ , नांदुरा आणि जुबेरखान सबदरखान रा. वार्ड क्रमांक ६ तिघे किग्ज ११पंजाब, विरूध्द गुजरात टायटन सामन्यादरम्यान ऑनलाइन जुगार खेळविताना आढळून आले. पोलीसांनी दोघांना अटक केली असून जुबेरखान हा फरार होण्यात यशस्वी झाला. घटनास्थळावरून ०९ मोबाईल, एक कंपनीचा लॅपटॉप ०१ महागडी दुचाकी, एक मोपेड आणि इतर साहित्य असा तीन लाख ४३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक सारंग आवाड , अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात एपीआय विलास सानप, हेकॉ. दीपक लेकुलवले, नापोकॉ गणेश पाटील, पोकॉ. मनोज खरडे, सुरेश भिसे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी गणेश पाटील यांच्या तक्रारीवरून जलंब पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विराधोत मजुका १२ अ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

नांदुरा रोड सोडला; आमसरी शिवारात कारवाई

आयपीएलच्या ऑनलाइन जुगाराचे मुख्य सट्टा केंद्र खामगावात या मथळ्याखाली लोकमतने बुधवारी वृत्त प्रकाशीत केले. या वृत्ताची दखल घेत गुरूवारी रात्री आमसरी शिवारातील जुगारावर कारवाई करण्यात आली. मात्र, त्याचवेळी खामगाव शहरातील तब्बल १२ पेक्षा अधिक आणि पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील तीन, हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील दोन, तर ग्रामीण आणि शिवाजी नगर पोलीस स्टेशन हद्दीतील सहा ठिकाणे कारवाई विनाच सोडल्याची चर्चा आहे.

Web Title: Police raid IPL betting den in Buldhana two arrested, one absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.