जुहूतील ‘सी प्रिन्सेस’ हॉटेलवर पोलिसांचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 04:24 AM2018-11-07T04:24:34+5:302018-11-07T04:25:06+5:30
जुहूतील ‘सी प्रिन्सेस’ या पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ६३ ग्राहकांसह ८१ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ३५ लाख ८० हजारांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले.
मुंबई - जुहूतील ‘सी प्रिन्सेस’ या पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ६३ ग्राहकांसह ८१ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ३५ लाख ८० हजारांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले.
हॉटेल ‘सी प्रिन्सेस’मध्ये सुखी हॉल या ठिकाणी जुगार खेळला जात असल्याची माहिती समाजसेवा शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त आर.बी. माने यांना मिळाली. त्यानुसार दोन दिवस पाळत ठेवून गुन्हे अन्वेषण निरीक्षक प्रभा राऊळ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने रात्री एकच्या सुमारास छापा टाकला.
त्या वेळी ६३ ग्राहक जुगार खेळत होते, तर ५४ महिला पोकर प्लेयर्स होत्या. क्लबचे व्यवस्थापक, २ चालक, १ रोखपाल, १५ कर्मचारी आणि ग्राहक मिळून ८१ जणांना कारवाई केली. जुगारासाठी वापरले जाणारे १८४७ प्लॅस्टिकचे शिक्केदेखील अधिकाºयांनी हस्तगत केले. असा एकूण ३५ लाख ८७ हजार, ४१० रुपयांचा ऐवज समाजसेवा शाखेने हस्तगत केला.
याचा तपास पूर्ण झाल्यावर पोलीस आरोपपत्र दाखल करतील़ आरोपींनी आरोप फेटाळल्यावर याचा खटला चालेल़
माजी मंत्र्यांच्या मुलाचाही समावेश?
सी प्रिन्सेस हॉटेलवरील छाप्यात एका माजी मंत्र्यांच्या मुलालाही अटक करण्यात आली आहे, असे टिष्ट्वट एका सामाजिक कार्यकर्त्याने केले होते. पोलिसांनी मात्र त्याचा इन्कार केला.