ड्रग्ज बनविणाऱ्या कारखान्यात पाेलिसांचा छापा; एक काेटी रुपयांहून अधिक कच्चा माल जप्त
By सचिन राऊत | Published: October 23, 2024 10:34 PM2024-10-23T22:34:53+5:302024-10-23T22:34:53+5:30
बार्शिटाकळी महागाव राेडवरील बंद जीनींगमधील प्रकार
अकाेला : बार्शिटाकळी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील महागाव राेडवरील एका बंद जीनींग प्रेसींगमध्ये ड्रग्ज बनविण्याचा कारखानाच सुरु असल्याच्या माहीतीवरुन स्थानीक गुन्हे शाखेसह बार्शिटाकळी पाेलिसांनी बुधवारी सायंकाळी छापा टाकला. या कारखाण्यातून ड्रग्ज बनिवण्याचा सुमारे एक काेटी रुपयांचा कच्चा माल पाेलिसांनी जप्त केला आहे. या ठिकाणावरुन तीन आराेपींना ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशीरापर्यंत ही कारवाइ सुरु हाेती.
बार्शिटाकळी ते महागाव राेडवर एक बंद पडलेली जीनींग प्रेसींग असून या ठिकाणी ड्रग्ज बनविण्यात येत असल्याची माहीती अकाेला पाेलिसांना मीळाली. या माहीतीवरुन पथकाने पाळत ठेउन बुधवारी सायंकाळी छापेमारी केली. या छापेमारीत सुमारे एक काेटी रुपयांच्यावर कींमत असलेला कच्चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर घटनास्थळावरुन तीन आराेपींनाही पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. तीनही आराेपी बाहेर जिल्हयातील असल्याची माहीती पाेलिसांनी दिली. बार्शिटाकळी तालुक्यात चक्क ड्रग्ज बनविण्याचा कारखानाच पाेलिसांच्या या कारवाइने उघड झाल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या कारवाइमुळे जिल्हयात ड्रग्जची माेठया प्रमाणात तस्करी हाेत असल्याचे समाेर आले आहे. ही कारवाइ पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखा व बार्शिटाकळी पाेलिसांनी केली.
८० पदार्थांचे घेतले नमुणे
बंद जिनींगमधून पाेलिसांनी ड्रग्ज बनिवण्याचा कारखान्यावर छापा टाकल्यानंतर या ठिकाणावरुन सुमारे ८० विविध पदार्थांचे नमुणे जप्त केले असून ते तपासणीसाठी प्रयाेगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. या ८० नमुण्यांची तपासणी झाल्यानंतर तसेच अहवाल आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा हाेणार असल्याची माहीती आहे.
एमडी ड्रग्ज बनविण्याचा संशय
महागाव राेडवरील बंद पडलेल्या जीनींग प्रेसींगमध्ये एम डी ड्रग्ज बनविण्यात येत असल्याचा प्राथमीक अंदाज पाेलिसांचा आहे. गत काही काळात राज्यात विविध ठिकाणी छापे टाकून एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रत्येक कारवाइत काेटयवधींचा आकडा समाेर आला आहे. त्यामुळे जीनींग प्रेसींगमध्ये एम डी ड्रग्ज बनविण्याचा कारखानाच सुरु करण्यात आला हाेता अशी माहीती पाेलिसांकडून प्राप्त झाली आहे.
आकडा तीन काेटींच्या घरात जाण्याची शक्यता
महागाव राेडवर पाेलिसांनी केलेल्या कारवाइनंतर या ठिकाणावरुन जप्त करण्यात आलेला कच्चा मालाचे माेजमाप सुरु हाेते. एक काेटी रुपयांच्यावर हा आकडा असला तरी तीन काेटींच्या घरात या ड्रग्जची कींमत जाणार असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.