हॉटेलमधील सेक्स रॅकेटवर पोलिसांचा छापा; तीन कॉलेज तरुणींसह 12 महिलांची सुटका, नोएडातील कुटुंबीयही हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 09:02 AM2021-03-21T09:02:25+5:302021-03-21T09:04:44+5:30

Sex Racket Exposed in Noida: तरुणींना नोएडाच्या वन स्टॉप सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. पुरुषांची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली जात होती. या गोरखधंद्याल पाठीशी घालणाऱ्या सहा पोलिसांवर देखील कारवाई करण्यात आली आहे.

Police raid on sex racket in hotel of Noida; Three college girls, family was shocked | हॉटेलमधील सेक्स रॅकेटवर पोलिसांचा छापा; तीन कॉलेज तरुणींसह 12 महिलांची सुटका, नोएडातील कुटुंबीयही हादरले

हॉटेलमधील सेक्स रॅकेटवर पोलिसांचा छापा; तीन कॉलेज तरुणींसह 12 महिलांची सुटका, नोएडातील कुटुंबीयही हादरले

googlenewsNext

नोएडा : ग्रेटर नोएडाच्या चीती गावामध्ये एका आलिशान हॉटेलवर शनिवारी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. येथे नोएडा, बुलंदशहर आणि आजुबाजुच्या भागातून लोक मौजमजा करण्यासाठी येत होते. पोलिसांनी छापा टाकून 12 तरुणी आणि 11 पुरुषांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणींमध्ये तीन ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थिनी आहेत. (Sex Racket exposed in Noida.)


यावेळी पोलिसांनी हॉटेच्या मालकासह मॅनेजरला अटक केली आहे. तसेच आपत्तीजनक वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. शहरापासून दूर असलेल्या या हॉटेलमध्ये हा गोरखधंदा सुरु होता. एसीपी बृजनंदन राय यांनी अटक झालेल्या आरोपींविरोधात सेक्स रॅकेटची गुन्हे दाखल केले आहेत. सोबतच सर्वांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. 


तरुणींना नोएडाच्या वन स्टॉप सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. पुरुषांची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली जात होती. या गोरखधंद्याल पाठीशी घालणाऱ्या सहा पोलिसांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. एसीपी ब्रजनंदन राय यांच्या म्हणण्यानुसार दनकौर-सिकंदराबाद रोडवरील न्यू क्राउन प्लाझा हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. हे हॉटेल 2014 पासून सुरु होते. या हॉटेलमध्ये चीती गावचा रहिवासी ज्ञानेंद्र मॅनेजर होता. शनिवारी दुपारी या हॉटेलवर छापा टाकला. 
पोलिसांनी मॅनेजरला ताब्यात घेऊन सर्व खोल्या उघडायला लावल्या. तसेच या खोल्यांमध्ये असलेल्या महिला आणि पुरुषांना ताब्यात घेण्यात आले. काही महिला पोलिसांना पाहून पळून जाऊ लागल्या, त्यांना महिला कॉन्स्टेबलच्या मदतीने अटक करण्यात आली. 


या सेक्स रॅकेटमध्ये नोएडासह दनकौर गावातील काही तरुणी यात सापडल्या आहेत. याची माहिती जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना कळली तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला. त्या साऱ्या कामाचे निमित्त करून घरातून सकाळी निघत होत्या. मात्र, आपल्याला त्या असे काही करतील याची कल्पना नव्हती असे या तरुणींच्या पालकांनी पोलिसांना सांगितले. 


पोलिसांनी सांगितले की, हॉटेल सुरु होते खरे परंतू तिथे जेवणाचे काहीच बनवत नव्हते. गेल्या काही महिन्यांपासून हा धंदा सुरु होता. पोलिसांना मिळालेल्या सुचनेच्या आधारे मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

Web Title: Police raid on sex racket in hotel of Noida; Three college girls, family was shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.