छम छम सुरु असताना पोलिसांनी बारवर टाकला छापा; सहा जणांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 13:54 IST2020-02-19T13:50:08+5:302020-02-19T13:54:05+5:30
या कारवाईवेळी ६ मुली अश्लील नृत्य करताना आढळल्या.

छम छम सुरु असताना पोलिसांनी बारवर टाकला छापा; सहा जणांना बेड्या
मुंबई - शरीरविक्रीच्या रॅकेटचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पश्चिम उपनगरात पोलिसांनी धाडसत्र सुरु केले आहे. अंधेरी पूर्वेकडील मानसा बारवर पोलिसांनी गुप्त माहितीवरून छापा टाकला होता. रविवारी रात्री अंधेरी पोलीस ठाण्याच्या पथकाने मानसा बारवर छापा टाकला. या कारवाईवेळी ६ मुली अश्लील नृत्य करताना आढळल्या. १ मॅनेजर, १ कॅशियर, ४ वेटर आणि ६ ग्राहकांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी भा. दं. वि. कलम २९४, ११४, ३४ आणि ३, ८ अश्लील नृत्य प्रतिबंधक अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अंधेरी पोलिसांनी अंधेरी येथील या बारवर छापा टाकला. त्यावेळी बारमध्ये अश्लील नृत्य केले जात होते असून सहा जणांना अटक केली आणि चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा हा छापा टाकण्यात आला.
या बारमध्ये महिलांना अश्लील नृत्य करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या बारवर छापा टाकण्यात आला. पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी सांगितले की, बारचा मालक, व्यवस्थापक, दोन वेटर आणि दोन ग्राहकांना अटक केली आहे. तर चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपींवर भा. दं. वि. कलम २९४ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.