पोलिस भरती परीक्षा कॉपी, आरोपी न्यायालयीन कोठडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 11:00 AM2023-06-20T11:00:35+5:302023-06-20T11:00:48+5:30

या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Police recruitment exam copy, accused in judicial custody | पोलिस भरती परीक्षा कॉपी, आरोपी न्यायालयीन कोठडीत

पोलिस भरती परीक्षा कॉपी, आरोपी न्यायालयीन कोठडीत

googlenewsNext

मुंबई : मुंबई पोलिस दलातील भरतीच्या लेखी परीक्षा कॉपी प्रकरणात भांडुप पोलिसांनी अटक केलेल्या दोन विद्यार्थ्यांना सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. 
भांडुपमधील व्हिलेज रोडवर असलेल्या ब्राईट स्कूल या परीक्षा केंद्रावर जालना येथील परीक्षार्थी बबलू मदनसिंग मेंढरवाल (२४) यांच्या संशयास्पद हालचाली पर्यवेक्षक पोलिसाने हेरल्या. तपासणीमध्ये मेंढरवाल हा कानात बसविलेल्या सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक डिवाइसचा वापर करून कॉपी करताना सापडला. त्याने एक डिवाईस पॅन्टमध्ये लपवले होते आणि यात तो प्रीतम गुरसिंग याची मदत घेतल्याचे समोर आले. या प्रकरणी बबलू याला अटक केली. त्यापाठोपाठ एकूण ५ जणांना अटक करण्यात आली.  त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

बीडमध्ये केली अटक 
गेल्या आठवड्यात भांडुप पोलिसांच्या तपास पथकाने या प्रकरणी अनिल गोपींगे आणि युवराज भावरे या दोघांना बीडमधून अटक केली. या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  

Web Title: Police recruitment exam copy, accused in judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.