प्रेमप्रकरणाच्या संशयावरून मुलाची हत्या, पोलिसांनी केला गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 09:54 PM2022-07-29T21:54:43+5:302022-07-29T21:55:49+5:30
Murder Case : प्रेमप्रकरणातून एका तरुणावर कुऱ्हाडीने आणि काठ्यांनी वार करून खून करण्यात आला.
झाशी : प्रेमप्रकरणातून एका तरुणाला काही लोकांनी इतकी मारहाण केली की, त्याचा मृत्यू झाला. हे धक्कादायक प्रकरण झाशीतील मौरानीपूर कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील रोनी गावातील आहे. येथे प्रेमप्रकरणातून एका तरुणावर कुऱ्हाडीने आणि काठ्यांनी वार करून खून करण्यात आला. 27 जुलैच्या रात्री मृत अशोकला घरातून बोलावल्यानंतर 5-6 जणांनी बेदम मारहाण केली. यानंतर त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करून रक्तबंबाळ केले.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला
तो मृत झाल्यानंतर आरोपीने तरुणाला बेवारस अवस्थेत सोडून दिले. तरुणाच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी रक्ताने माखलेल्या अशोकला तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. त्याचवेळी तरुणाची प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉक्टरांनी त्याला मेडिकल कॉलेज, झाशी येथे रेफर केले. या तरुणाचा वाटेतच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
गावातीलच प्रमोदवर खुनाचा संशय
झाशीच्या रोनी गावात राहणारा 18 वर्षीय अशोक अहिरवार काल रात्री त्याच्या घरी होता. कोणाच्यातरी बोलवण्यावरून तो घराबाहेर पडला आणि गावातील प्रमोद व त्याच्या साथीदारांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर लाठ्या-कुऱ्हाडीने हल्ला केला. मृत भागचंदच्या वडिलांनी सांगितले की, आमच्या मुलाला कुऱ्हाडीने आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. प्रमोद आणि त्याची पत्नी आणि मुलासह त्यांच्या साथीदारांनी त्याची हत्या केली आहे. सीओ मौरानीपूर अरुण कुमार चौरसिया यांनी सांगितले की, मौरानीपूर पोलीस स्टेशनला गावातील अशोकला रोन्नी गावात प्रमोद अहिरवार यांनी जबर मारहाण माहिती मिळाली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.