रागाने घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा घेतला पोलिसांनी शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 07:16 PM2022-03-30T19:16:25+5:302022-03-30T19:17:44+5:30
Kidnap Case : उल्हासनगरात अल्पवयीन मुलीच्या अपहरण गुन्ह्यात वाढ झाली असून हिललाईन पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याचा प्रकार ४ महिन्यानंतर उघड झाला.
उल्हासनगर : रागाच्या भरात मित्राच्या मामाच्या घरी गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला शोधण्यात विठ्ठलवाडी पोलिसांला यश आले. अल्पवयीन मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्या तक्रारीवरून आदी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
उल्हासनगरात अल्पवयीन मुलीच्या अपहरण गुन्ह्यात वाढ झाली असून हिललाईन पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याचा प्रकार ४ महिन्यानंतर उघड झाला. शहर पूर्वेत राहणारी एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी २० मार्च रोजी आई-वडील घरात नसताना कपाटातील ४० हजार रुपये घेऊन निघून गेली.
याप्रकरणी आई-वडिलांच्या तक्रारीवरून मुलीच्या अपहरणाचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी पथक स्थापन करून शोध मोहीम सुरू केली. ४ दिवसात मुलीचा शोध घेतला असून मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात दिले. घरगुती वादातून मुलगी मित्राच्या मामाच्या घरी ठाणे येथे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुलगी सापडल्याने आई-वडिलांनी समाधान व्यक्त केले. पालकांनी अल्पवयीन मुले-मुलीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले.