किल्लारीत पोलिसाची गोळी झाडून आत्महत्या; प्राथमिक कारण आर्थिक तणावाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 07:55 AM2022-03-13T07:55:17+5:302022-03-13T07:56:39+5:30

किल्लारी पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने रविवारी पहाटे दोनच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

police shot suicide in killari latur primary cause is financial stress | किल्लारीत पोलिसाची गोळी झाडून आत्महत्या; प्राथमिक कारण आर्थिक तणावाचे

किल्लारीत पोलिसाची गोळी झाडून आत्महत्या; प्राथमिक कारण आर्थिक तणावाचे

Next

लातूर: जिल्ह्यातील किल्लारी पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने रविवारी पहाटे दोनच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले की, साहेबराव सावंत हे किल्लारी पोलीस ठाण्यात कामावर होते. २०१७ ते १८ दरम्यान त्यांनी काहीजणांना पैसे दिले होते. ते परत मिळत नव्हते, त्याच्या तणावातून त्यांनी रायफलीने स्वतःवर गोळी झाडून घेतली असल्याचे समोर येत आहे.

चिठ्ठीत लिहिल्याची माहिती...

आत्महत्येपूर्वी पोलीस कर्मचारी साहेबराव सावंत यांनी एक चिठ्ठी लिहिली, अशी माहिती आहे. त्यात काही नावे लिहिली आहेत. त्यावरून कारण आणि घटनाक्रम समोर येईल, असे सांगण्यात आले. पोलीस त्यादिशेने तपास करत आहेत.
 

Web Title: police shot suicide in killari latur primary cause is financial stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.