खटला चालविणाऱ्या वकिलांवर पोलिसांनी दाखविला अविश्वास?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 07:19 AM2021-01-05T07:19:04+5:302021-01-05T07:19:21+5:30

crime News अश्विनी बिद्रे हत्याकांड : प्रदीप घरत यांचा खटला सोडण्याचा इशारा

Police show distrust in prosecuting lawyers? | खटला चालविणाऱ्या वकिलांवर पोलिसांनी दाखविला अविश्वास?

खटला चालविणाऱ्या वकिलांवर पोलिसांनी दाखविला अविश्वास?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा खटला लढवणारे सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत यांना मानधन देण्यासाठी त्यांची न्यायालयातील उपस्थिती व कामकाजाची सविस्तर माहिती देण्याबाबत नवी मुंबई पोलिसांनी कळविले आहे. आपले काम प्रामाणिक व चोखपणे पार पाडणारे वकील यांच्यावर पोलिसांनी दाखविलेल्या या अविश्वासाबद्दल ॲड. घरत यांनी नाराजी व्यक्त करीत थेट खटला सोडण्याचा इशारा दिला आहे.


न्यायालयाच्या कामकाजाची माहिती ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असताना पोलिसांनी घरत यांच्यावर अविश्वास दाखवून त्यांच्याकडून माहिती मागविल्याने ॲड. घरत चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे त्यांनी नवी मुंबई पोलिसांना पत्र लिहून महिन्याभरात मानधन देण्याबाबत सूचित केले. त्यानंतर ते न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडून न्यायालयातील उपस्थितीची माहिती घेऊन बिल कोषागाराकडे पाठवितात. त्यानंतर ती बिले काढली जातात. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी वकील घरत यांचे मानधन देण्यासाठी त्यांची न्यायालयातील उपस्थिती माहिती देण्यास सांगितले. त्यामुळे ॲड. घरत संतापले असून माझी न्यायालयातील कामकाजाची माहिती ठेवण्याची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांची आहे. तरीही पोलिसांनी त्यांची जबाबदारी झटकून अविश्वास दाखविण्यात आल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे

घरत यांचे तपास अधिकाऱ्यांना पत्र
n पोलिसांनी वकील घरत यांच्या हजेरीबाबतची माहिती घरत यांच्याकडून मागविल्यामुळे संतापलेल्या घरत यांनी या खटल्याचे तपास अधिकारी एसीपी विनोद चव्हाण यांनीच प्रामाणिकपणे तारखेला न्यायालयात हजर राहावे, असा सल्ला दिला आहे. चव्हाण हे स्वतः नियमित तारखेला उपस्थित राहिल्यास या खटल्याच्या कामकाजात काय सुरू आहे? याची माहिती वकिलांकडून घेण्याची वेळ येणार नसल्याचे घरत यांनी चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: Police show distrust in prosecuting lawyers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.