पोलिस सायरन वाजला अन् चोरीचा प्रयत्न फसला; नाशकातील इंडियन बँकेतील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2023 05:04 PM2023-07-20T17:04:41+5:302023-07-20T17:05:26+5:30

अंबड पोलिस ठाण्याच्या गस्ती पथकच्या वाहनांचा सायरन वाजल्याने चोरट्यांना पळ काढल्याचे बँकेतील दरोड्याचा प्रयत्न फसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Police sirens go off and the attempted theft is foiled; Incident at Indian Bank in Nashik | पोलिस सायरन वाजला अन् चोरीचा प्रयत्न फसला; नाशकातील इंडियन बँकेतील घटना 

पोलिस सायरन वाजला अन् चोरीचा प्रयत्न फसला; नाशकातील इंडियन बँकेतील घटना 

googlenewsNext

- नरेंद्र दंडगव्हाळ 

सिडको / नाशिक - अंबड औद्योगिक वसाहतीत हॉटेल वेलकम शेजारील इंडियन बँकेत गुरुवारी (दि.20) मध्यरात्रीच्या सुमारास चोरत्यानीबँकेत पाठीमागून खिडकीचे ग्रील कापून प्रवेश करीत बँकेतील रोकड चोरण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी बँकेतील लॉकर रूमच्या वरचा स्लॅबही फोडला. मात्र याचवेळी अंबड पोलिस ठाण्याच्या गस्ती पथकच्या वाहनांचा सायरन वाजल्याने चोरट्यांना पळ काढल्याचे बँकेतील दरोड्याचा प्रयत्न फसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

इंडियन बँकेतील अधिकारी व कर्मचारी गुरुवारी सकाळी नियमित वेळेत बँकेत पोहोचल्यानंतर त्यांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ लॉकर व रोकडच्या तिजोरीची तपासणी केली. मात्र बँकेतीस कोणतही मौल्यवान वस्तू अथवा रक्कम चोरी झाली नसल्याचे प्रथम दर्शनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले, त्यामुळे याभागातून रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गस्तीपथकाच्या वाहनाच्या सायरनचा आवाज कानावार पडल्याने चोरट्यांनी बँकेतून पळ काढला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अंबड औद्योगिक वसाहतीतील महामार्गालगत असलेल्या इंडियन बँक येथे अज्ञात चोरट्यांनी लॉकर असलेल्या स्ट्रॉंगरूमवरील स्लॅब मशीनच्या सहाय्याने फोडला. त्यानंतर आतील लॉकरही फोडले. बँकेतील काहीही चोरी गेले नाही त्यामुळे चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त गुन्हे सिताराम कोल्हे, शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, मनोहर करंदे, गुन्हे शाखा युनिट दोनचे रणजीत नलावडे यांच्यासह गुन्हे शोध पथक व अंबड पोलीस ठाणे व चुंचाळे पोलिस चौकीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनी फॉरेन्सिक टीम व श्वानपथकाला पाचारण करीत बँकेत चोरट्यांचे ठसे व अन्य काही माहिती मिळविण्याता प्रयत्न केला. 

सीसीटीव्ही तपासण्याचे काम सूरू
इंडियन बँकेतील दरोडा प्रकरणात पोलिसांकडून बँक व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याघटनेशी संबधित आणि या भागात येणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्हीवरही पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

Web Title: Police sirens go off and the attempted theft is foiled; Incident at Indian Bank in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.