“माझ्या मुलांची काळजी घ्या, मी जातोय”; विधानसभेच्या गेटसमोरच पोलिसाने स्वत:वर गोळी झाडली
By प्रविण मरगळे | Published: March 4, 2021 08:25 PM2021-03-04T20:25:38+5:302021-03-04T20:26:03+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, या पोलिसाचं नाव निर्मल चौबे असं सांगितलं जात आहे, १९८७-८८ बॅचमधील ते उपनिरीक्षक आहेत.
लखनौ – उत्तर प्रदेशातील लखनौ येथे विधानसभेच्या गेटसमोरच एका पोलीस उपनिरीक्षकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे, एसआयने त्यांच्या शासकीय बंदुकीतून गेटनंबर ७ च्या समोर स्वत:वर गोळी झाडली, त्याच जागेवरच पोलिसाचा मृत्यू झाला. (Police Officer Suicide outside Vidhan Sabha Gate at Uttar Pradesh)
मिळालेल्या माहितीनुसार, या पोलिसाचं नाव निर्मल चौबे असं सांगितलं जात आहे, १९८७-८८ बॅचमधील ते उपनिरीक्षक आहेत. बंथरा पोलीस ठाण्यात त्यांना चार्ज देण्यात आला होता, विधानसभा अधिवेशनावेळी त्यांची ड्युटी त्या परिसरात लावण्यात आली होती, त्यामुळे विधानसभेच्या गेटवर ते पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. आज तकच्या माहितीनुसार आत्महत्या करणारा पोलीस उपनिरीक्षक हा तणावाखाली होता. त्यामुळेच ऑन ड्युटी आत्महत्या करण्याचा धक्कादायक निर्णय त्यांनी घेतला.
A police sub-inspector shoots himself dead in suspicious conditions at Gate no 7 of the Assembly in Lucknow. More details awaited. pic.twitter.com/qHdqo4DGQT
— ANI UP (@ANINewsUP) March 4, 2021
जेव्हा पोलीस उपनिरीक्षक चौबे यांनी स्वत:वर गोळी झाडली तेव्हा परिसरात खळबळ माजली, विधानसभेच्या सुरक्षेसाठी असणारे पोलिसांनाही धक्का बसला, गोळीच्या आवाजामुळे सर्व लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं, त्यानंतर विधानसभेच्या गेट नंबर ७ समोर असलेल्या पार्किंगमध्ये पोलीस अधिकारी निर्मल चौबे यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं, गोळी झाडल्यानंतर चौबे जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
घटनास्थळी त्यांची शासकीय बंदूक सापडली, त्यानंतर निर्मल चौबे यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले, तेथे डॉक्टरांनी चौबे यांना मृत घोषित केले, मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला, नातेवाईकांना त्यांच्या आत्महत्येची माहिती देण्यात आली, सहाय्यक आयुक्त नवीन अरोडा यांनी सांगितले की, मृतक पोलीस अधिकारी आजारामुळे त्रस्त होते, त्यांच्याकडे सुसाईड नोट आढळली, त्यात लिहंल होतं की, मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलाची काळजी घ्या, मी आजाराने त्रस्त झालो आहे, मी जात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.