तडीपार न करण्यासाठी आरोपीकडे लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 09:08 PM2019-04-04T21:08:53+5:302019-04-04T21:56:00+5:30

तक्रारदाराला तडीपार न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दळवीने अडीच लाख रुपयांची लाच मागितली.

The police sub-inspector, who was demanding a bribe, was arrested | तडीपार न करण्यासाठी आरोपीकडे लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

तडीपार न करण्यासाठी आरोपीकडे लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

Next
ठळक मुद्देजगदीश दळवी असं या उपनिरीक्षकाचं नाव आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोपीला तडीपार न करण्यासाठी लाच मागणाऱ्या साकीनाका पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. जगदीश दळवी असं या उपनिरीक्षकाचं नाव आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीची असल्याने सराईत आरोपींकडून कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलीस त्यांच्यावर तडीपारची कारवाई करतात. साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रारदार आरोपीवर २०१४ साली एका गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपपत्र सादर केल्यानंतर न्यायालयाने त्याला ३ वर्ष कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या गुन्ह्यात आरोपीला न्यायालयाने जामीनावर सोडण्यात आले होते. दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संबंधीत तक्रारदाराला तडीपारीची नोटीस पाठवण्यात आला होती. तक्रारदाराला तडीपार न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दळवीने अडीच लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर दळवीने लाचेचा पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये मागितले. मात्र तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. 

Web Title: The police sub-inspector, who was demanding a bribe, was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.