आंघोळ करत होते तेव्हा...! महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी पोलिसाचे निलंबन, ठोकल्या बेडयाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 14:34 IST2022-04-08T13:31:24+5:302022-04-08T14:34:17+5:30
Police Suspended : पोलीस लाईन्समध्ये तैनात असलेल्या एका महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी एका हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे.

आंघोळ करत होते तेव्हा...! महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी पोलिसाचे निलंबन, ठोकल्या बेडयाही
गुरुग्राम - हरियाणाच्या गुरुग्राममधील पोलीस लाईन्समध्ये तैनात असलेल्या एका महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी एका हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही दिली.
कोर्टात लग्न करून महिला आणि तिचा पती घरच्यांच्या धमक्यांमुळे पोलिस लाइन्सच्या 'सेफ हाऊस'मध्ये राहत होते. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील एका २३ वर्षीय महिलेने ३ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर मिळालेल्या धमक्यांमुळे तिने आणि तिच्या पतीने गुरुग्राम पोलिसांची मदत घेतली होती आणि तेव्हापासून ते पोलिस लाईन्समध्ये होते. एफआयआरमध्ये महिलेने म्हटले आहे की, मी बाथरूमचा दरवाजा बंद करून आंघोळ करत होते आणि जेव्हा मला लक्षात आले की, सुरेंद्र लपून माझा व्हिडिओ बनवत आहे. मी अलार्म वाजवला, त्यानंतर तो पळून गेला.
गुरुग्रामचे पोलिस आयुक्त कला रामचंद्रन यांनी पीटीआयला सांगितले की, एफआयआर नोंदवल्यानंतर आरोपी हेड कॉन्स्टेबलला तात्काळ अटक करण्यात आली. पुढे ते म्हणाले की, आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.