लॉकडाऊनमध्ये मद्य वाहतूक करणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 07:06 PM2020-03-30T19:06:55+5:302020-03-30T19:13:37+5:30
तिघांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ) सह भादंवि कलम 188 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वैभव गायकपनवेल - लॉकडाऊन असताना थेट मद्याची वाहतूक करणारे त्रिकुट पनवेल शहर पोलिसांच्या हाती लागले आहे.पळस्पे फाट्याजवळ नाकाबंदीत एमएच.03,सीएच.2827 या ओला कंपनीच्या कारने जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी अडवले दरम्यान कारची तपासणी करताना या कारमधून मोठ्या प्रमाणात बियरच्या बाटल्या सापडल्याची घटना सोमवारी घडली.
यावेळी पोलिसांनी या त्रिकुटाला चांगलीच अद्दल घडविली.बियरचा बाटल्या समोर ठेवून या त्रिकुटाला पोलिसांनी उठा बशा काढण्यास सांगितले.शागिर छोटू खान,शिवा हनुमंता गुडपास, उबेद शकुर शेख अशी या तिघांची नावे आहेत. तिघेही मुंबई कुर्ला येथील रहिवासी आहेत.यावेळी बियरचा 35 बाटल्या व कार यावेळी पनवेल शहर पोलिसांनी जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी दिली.तिघांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ) सह भादंवि कलम 188 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.