Raj Thackeray :शेवटची साडेचार मिनिटं भोवणार?, राज ठाकरेंच्या सभेतील 'या' वक्तव्यांवर पोलिसांनी घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 05:58 PM2022-05-03T17:58:31+5:302022-05-03T18:11:35+5:30

Raj Thackeray : हे भोंगे उतरले गेलेच पाहिजे... सगळ्या धार्मिक स्थळावरचे मग मंदिरावरचे असतील तरी उतरले गेले पाहीजे, पण यांचे उतरल्यानंतर आपण सगळेजण..आज ही परीस्थीती आहे. अभी नही तो कभी नही. माझ्या देशातल्या सर्व देश वासियांना व हिंदू बाधंवाना भगिनींना विनंती आहे की, जर हे 3 तारखेपर्यंत ऐकले नाही तर 4 तारखेला हनुमान चालीसा मला ऐकु आलीच पाहिजे.

Police took objection to some provocative statements of Raj Thackeray | Raj Thackeray :शेवटची साडेचार मिनिटं भोवणार?, राज ठाकरेंच्या सभेतील 'या' वक्तव्यांवर पोलिसांनी घेतला आक्षेप

Raj Thackeray :शेवटची साडेचार मिनिटं भोवणार?, राज ठाकरेंच्या सभेतील 'या' वक्तव्यांवर पोलिसांनी घेतला आक्षेप

googlenewsNext

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्याऔरंगाबाद सभेतील शेवटची साडेचार मिनिटं वादग्रस्त ठरणार असून कोणकोणत्या चिथावणीखोर वक्तव्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. राज ठाकरेंविरोधातील एफआयआरमध्ये राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेतील भाषणातील काही आक्षेपार्ह मुद्दे नमूद करत पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. 

पोलीस उपनिरीक्षक गजानन फकिरराव इंगळे (३५) यांनी सरकार तर्फे फिर्यादी बनून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि औरंगाबाद सभा आयोजित करणाऱ्या राजीव जावळीकर यांच्या विरोधात औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. १ मे रोजी झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेचे चित्रीकरण करण्यासाठी पोलीस विभागामार्फत CCTV कॅमेरे आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी कॅमेरे लावण्यात आलेले होते. या सभेचे संपूर्ण चित्रीकरण व रेकर्डींग करण्यात आले आहे. सभा संपल्यानंतर सभेच्या ठिकाणी असलेले बंदोबस्त प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त शहर विभाग यांनी आम्हास सभेच्या ठिकाणी उपलब्ध असलेले CCTV चित्रीकरण आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग पाहून त्यामध्ये काही आक्षेपार्ह वक्तव्ये आणि लेखी दिलेल्या अटी व शर्तीचे उलंघन झाले आहे.  याची तपासणी करून खात्री करण्याबाबत सांगितले. त्यावरून सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद शहर येथे जाऊन त्यांचे मदतीने झालेल्या सभेचे CCTV फुटेज आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगचे तपासणी करण्यात आली. त्यात १ मी रोजी सायंकाळी ६.३० ते ९.३० वाजेच्या दरम्यान मराठवाडा सांस्कृतीक क्रिडा मंडळ मैदानावर खडकेश्वर औरंगाबाद येथे सभा झाली असून या सभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात माझी पोलीसांना नम्र विनंती आहे. जर सभेच्या वेळेला बांग सुरु करणार असतील आपण आत्ताच्या आत्ता ताबडतोय तोंडात बोळा कोंबाबा यांना जर सहज सरळ मार्गाने समजत नसेल तर मग त्याच्या नंतर महाराष्ट्रात काय होईल हे मला माहीत नाही. येथे जे कोणी पोलीस अधिकारी असतील तर त्यांना मी सांगतो की, आत्ताचे आत्ता पहिले जाऊन बंद करा आणि माझ एक म्हणन आहे, या बाबतीत त्यांना जर समजा सरळ भाषेत समजत नसेल ना तर एकदा काय ते तिच्या आयला होऊनच जाऊदे अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही. संभाजीनगरच्या पोलिसांना माझी नम्र विनंती परत करतोय मी आपल्याला परत सांगतोय ते जर या पध्दतीने वागणार असतील त्यांना जर सरळ सांगून जर समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटामध्ये काय ताकत आहे. ती यांना एकदा दाखवावीच लागेल आणि म्हणून माझी पोलीसांना विनंती आहे की, हे पहील्यांदा थोबाड बंद करा या लोकांची माझी संपूर्ण देशवासियांना अख्ख देशातल्या माझ्या हिंदु बाधवांना भगिनींना माझी विनंती आहे की, बिलकुल मागचा पुढचा काही विचार करु नका. हे भोंगे उतरले गेलेच पाहिजे... सगळ्या धार्मिक स्थळावरचे मग मंदिरावरचे असतील तरी उतरले गेले पाहीजे, पण यांचे उतरल्यानंतर आपण सगळेजण..आज ही परीस्थीती आहे. अभी नही तो कभी नही. माझ्या देशातल्या सर्व देश वासियांना व हिंदू बाधंवाना भगिनींना विनंती आहे की, जर हे 3 तारखेपर्यंत ऐकले नाही तर 4 तारखेला हनुमान चालीसा मला ऐकु आलीच पाहिजे. पोलीसाकंडून वाटल्यास परवानगी घ्या. रितसर परवानगी घ्या, लाऊडस्पीकरची परवानगी घ्या, त्यांना द्यावी लागते. पण ती  परवानगी घेऊन आपण सगळ्या गोष्टी जोरात कराल आणि सामाजिक दृष्ट्या हा इतक्या वर्षाचा प्रलंबित प्रश्न हा कायमचा निकाली लागेल यासाठी सगळ्यांनी आपण हातभार लावावा असे आक्षेपार्ह वक्तव्य राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात केले आहे, याचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. 

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुवात; औरंगाबाद पोलीस एक्शनमोडमध्ये

राज ठाकरेंवर मोठी कारवाई, औरंगाबादेत गुन्हा दाखल

असे सभेचे CCTV फुटेज रेकॉर्डिंगच्या तपासणी व अवलोकनात दिसून आले आहे. वर नमुद भाषणातील वक्तव्यामुळे सभेला उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाला कारावासाच्या शिक्षेस पात्र असणारा अपराध करण्यास चिथावणी मिळेल, त्यांचेकडून गंभीर शांतताभंग होईल, त्यांचेकडून सार्वजनिक प्रशांतता विरोधी अपराध घडेल, अगर दंग्या सारखा अपराध घडेल हे माहित असूनही बेछूट, चिथावणीखोर वक्तव्य करुन  पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद शहर मार्फत त्यांना लेखी पत्राने घालून दिलेल्या व संयोजकाच्या बैठकीत समजावुन सांगितलेल्या अटी व शर्तीचा भंग केला, म्हणून राज ठाकरे, सभेचे आयोजक राजीव जावळीकर व इतर संयोजक यांच्याविरुध्द भादंवि कलम 116 117,153 सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अभिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Police took objection to some provocative statements of Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.