ऐरोली गोळीबारप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 09:09 PM2019-07-15T21:09:02+5:302019-07-15T21:12:19+5:30
ऐरोली येथील एका हॉटेलमध्ये दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे.
नवी मुंबई - ऐरोली येथील गोळीबारप्रकरणी ठाण्याचे शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक संजय भोईर यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून ही चौकशी सुरु आहे. त्यांची चौकशी. संजय भोईर हे ठाण्याच्या बाळकूमचे शिवसेनचे नगरसेवक आहेत. ऐरोली येथील एका हॉटेलमध्ये दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे.
ऐरोली सेक्टर-९ येथील गरम मसाला हॉटेलमध्ये रविवारी मध्यरात्री दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही गटात बाचाबाची होऊन अमित भोगले याने ३ राऊंड फायर केल्याचेही समजते. दोन्ही टोळ्यांमधील गुंड हे भांडूपमधील दोन टोळ्यांत चकमक झाली होती. गरम मसाला हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेचा बारकाईने रबाळे पोलीस तपास करीत आहेत. अमित भोगले व अज्ञात दोघांवर रबाळे पोलीस ठाण्यात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याची शक्यता असून बाळकूमचे नगरसेवक संजय भोईर यांना पोलिसांनी चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवी मुंबई - ऐरोली येथील गोळीबारप्रकरणी ठाण्याचे शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक संजय भोईर यांना चौकशीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) July 15, 2019