बालविवाहाचा प्रयत्न पोलिसांनी उधळला, नवरदेवासह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 05:09 PM2018-09-18T17:09:16+5:302018-09-18T17:09:43+5:30

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बावखळ पाडा येथील हुनमान मंदिरात एका अल्पयीन मुलीचा बालविवाह लावण्यात येत असल्याची माहिती एका स्वयंसेवी संस्थेने विरार पोलिसांनी दिली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन विवाह सुरू असताना तो थांबवला आणि मुलीची सुटका केली.

Police tried to evade the child marriage, arresting three people along with Nawarda | बालविवाहाचा प्रयत्न पोलिसांनी उधळला, नवरदेवासह तिघांना अटक

बालविवाहाचा प्रयत्न पोलिसांनी उधळला, नवरदेवासह तिघांना अटक

Next

विरार - विरार पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा बालविवाह कऱण्याचा प्रयत्न ऐनवेळी कारवाई करून उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी लग्नाला हजर असणाऱ्या पंचवीस जणांविरोधात गुन्हा दाखल करून ३ जणांना अटक केली आहे. त्यात नवरदेवाचाही समावेश आहे. 

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बावखळ पाडा येथील हुनमान मंदिरात एका अल्पयीन मुलीचा बालविवाह लावण्यात येत असल्याची माहिती एका स्वयंसेवी संस्थेने विरार पोलिसांनी दिली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन विवाह सुरू असताना तो थांबवला आणि मुलीची सुटका केली. १६ वर्षीय मुलीचे २८ वर्षीय तरुणाचे लग्न लावून देण्यात येत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी नवरदेव वसंत राठोड (२८) मुलाची आई झीमाबाई राठोड(२५) आणि मुलीचे वडील विजय जाधव (४२) यांना अटक केली आहे. तसेच लग्नाच्या वेळी हजर असणाऱ्या २५ जणांवर बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ नुसार कलम ९ व ११ नुसार गुन्हा दाखल केला आहे. उर्वरित आरोपींवर अटकेची कारवाई सुरू असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी दिली. आम्हाला या बालविवाहाबाबत माहिती मिळतात आम्ही जाऊन कारवाई केली आणि आरोपींवर गुन्हा दाखल केला अशी माहिती विरारचे उपअधीक्षक जयंत बजबळे यांनी दिली. आरोपी हे वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानिव बाग येथील बंजारा वसाहतीत राहतात. मुलीच्या मर्जीविरोधात हे लग्न लावून देण्यात येत होते. 

Web Title: Police tried to evade the child marriage, arresting three people along with Nawarda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.