पोलीस शोधायला गेले पत्रकार बाळ बोठे, सापडला फरार डॉक्टर निलेश शेळके
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 18:15 IST2020-12-25T18:14:45+5:302020-12-25T18:15:16+5:30
Rekha jare Murder: अहमदनगर शहर सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या बोगस कर्जवाटप प्रकरणात शेळके याच्यावर सप्टेंबर २०१८ मध्ये गुन्हा दाखल आहे.

पोलीस शोधायला गेले पत्रकार बाळ बोठे, सापडला फरार डॉक्टर निलेश शेळके
अहमदनगर : रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ. ज. बोठे याचा शोध घेत असतांना पोलिसांना गेल्या अडीज वर्षांपासून फरार असलेला आरोपी डॉ. निलेश शेळके सापडला आहे. पोलिसांनी त्याला शुक्रवारी पुणे येथून ताब्यात घेतले असल्याचे समजते.
अहमदनगर शहर सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या बोगस कर्जवाटप प्रकरणात शेळके याच्यावर सप्टेंबर २०१८ मध्ये गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून शेळके पोलिसांना सापडलेला नाही. दरम्यान पोलीस २० ते २२ दिवसांपासून फरार बोठे याचा शोध घेत आहेत.
बोठे हा पुणे येथे शेळके याच्याकडे लपला असल्याच्या संशयावरून पोलीस उपाधीक्षक अजित पाटील व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेतला़ यावेळी शेळके सापडला मात्र
बोठे याने पुन्हा गुंगारा दिला. रेखा जरे हत्याकांडात चौकशी केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा शेळके याला अटक करू शकते.