पोलिसांशी हुज्जत घालणारे टिपले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 09:17 PM2018-09-05T21:17:52+5:302018-09-05T21:18:27+5:30
वाहतूक पोलिसांना आता दिले जाणार कॅमरे
पणजी - वाहतूक पोलिसांची हुज्जत घालण्याची सवय असलेल्यांसाठी वाईट खबर आहे. वाहतूक पोलिसांना आता कॅमरे दिले जाणार असल्यामुळे हुज्जत घालणारे आणि पोलीस यांच्यतील संवाद व्हिडिओसह रेकॉर्ड केला जाणार आहे. त्यामुळे पोलिसांना दुरुत्तरे देणाऱ्या गुन्हे दाखलही केले जाऊ शकतील.
गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागासाठी कॅमरे खरेदी करण्यात आले आहेत. हे कॅमरे उत्तर व दक्षिण गोव्यातील वाहतूक विभागाला दिले जाणार आहेत. रस्त्यावर राहून वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना हे कॅमरे दिले जाणार आहेत. लोक व पोलीस यांच्यातील संवाद टीपणे व इतर कामासाठी त्याचा वापर केला जाणार आहे. केवळ एक स्वीच दाबून रेकॉर्डिंग सुरू करणे या कॅमऱ्यांमुळे शक्य होते.
वाहतूकीवर नियंत्रण ठेवताना वाहतूक पोलिसांना ज्या समस्या उद्भवतात त्यात लोकांकडून हुज्जत घालण्याचे प्रकार अधिक आहेत. वाहतूक नियमाचा भंग केल्यामुळे ज्यावेळी एखाद्याला दंड केला जातो. त्यावेळी अशी हुज्जत घालणे, इतरांवर कारवाई का नाही माझ्यावरच का? अशा प्रकारचे उलट प्रश्न विचारणे व दुरुत्तरे देणे असे प्रकार घडत असल्याच्या वाहतूक पोलिसांच्या तक्रारी होत्या. अशा लोकांवर अंकूश ठेवण्यासाठी हे कॅमरे देण्यात आले आहेत अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली. कॅमऱ्यामधील रेकॉर्डिंगच्या आधारावर पोलीसनंतर सबंधित व्यक्तीवर गुन्हेही दाखल करू शकतात. तसेच या कॅमऱ्याचा आणखी एक फायदा म्हणजे पोलिसांचीही लोकांबरोबरची वागणूक या कॅमेऱ्यात टिपली जाणार असल्यामुळे पोलिसांवरही अंकूश राहणार आहे. वाहतूक पोलिसांना कॅमरे देण्याची पद्धत अनेक युरोपीय राष्ट्रात आहे. ते कॅमरे लहान असतात आणि खिशाला लावलेले असतात. समोरचा माणूस जेव्हा ऐकायच्या मनस्थितीत नसतो तेव्हा केवळ एक स्वी दाबल्यावर कॅमºयातून रेकॉर्डिंग सुरू होते. अशा प्रकारचा देशातील हा पहिलाच प्रयत्न आहे.