खाकीवर डाग! पोलीस महिलेनं प्रियकराच्या मदतीने रचला हत्येचा डाव; रिक्षाचालक पतीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 12:26 AM2021-03-22T00:26:47+5:302021-03-22T00:27:23+5:30

जे रिक्षाभाडे घेऊन पाटील मनोरला निघाले, यांनीच हत्या केल्याचा पोलिसांना संशय होता. संध्याकाळच्या वेळेला त्यांचा रिक्षाचालक मित्र मनोर पोलीस ठाण्यात आला

Police woman plotted murder with the help of boyfriend; Rickshaw driver's husband killed | खाकीवर डाग! पोलीस महिलेनं प्रियकराच्या मदतीने रचला हत्येचा डाव; रिक्षाचालक पतीची हत्या

खाकीवर डाग! पोलीस महिलेनं प्रियकराच्या मदतीने रचला हत्येचा डाव; रिक्षाचालक पतीची हत्या

googlenewsNext

मंगेश कराळे

नालासोपारा : वसईच्या पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी स्नेहल पाटील हिने प्रियकर पोलीस हवालदार विकास पष्टे (२८) याच्यासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून पती पुंडलिक पाटील यांची सुपारी देऊन तीन आरोपींकडून हत्या केली होती. ही घटना उघड झाल्यानंतर पालघर जिल्ह्यासह वसई तालुक्याच्या पोलीस दलात खळबळ माजली होती. या हत्याकांडामुळे खाकीवरच रक्ताचे डाग असल्याची चर्चा सामान्यांत  आहे. 

पोलीस असूनही अनैतिक संबंधासाठी खाकीचा वापर करून सुपारी देत, हत्या घडवून आणून व अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी गांभीर्याने लक्ष घालून दोन्ही आरोपींना निलंबित केले आहे. वसई पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी स्नेहल पाटील यांचा रिक्षाचालक पती पुंडलिक पाटील (३०) यांची मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर पोलीस ठाण्याअंतर्गत ढेकाळे गावऱ्या हद्दीमध्ये धारदार शस्त्राने हल्ला करून, हत्या केलेला मृतदेह १८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री त्याच्याच रिक्षाच्या मागील बाजूला प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गस्तीदरम्यान सापडला. आरोपींनी हत्या करून रिक्षाचा अपघात झाला असल्याचा बनाव आखला होता, पण दराडे यांना हत्याच असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. 

जे रिक्षाभाडे घेऊन पाटील मनोरला निघाले, यांनीच हत्या केल्याचा पोलिसांना संशय होता. संध्याकाळच्या वेळेला त्यांचा रिक्षाचालक मित्र मनोर पोलीस ठाण्यात आला. तो नेहमीचे भाडे घेऊन येणार असल्याने, मला भेटण्यासाठी त्याने फोन केला असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पाटील हे कोणाला घेऊन आले, याची माहिती मिळविण्यास सुरुवात केली. एका मुलाने माहिती दिली. वसईच्या इंडस्ट्रीतील तरुण आणि त्याचे दोन मित्र १५ ते २० दिवसांनी वाडा गावात घरी रिक्षाने येतात. पोलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली. एकाला पकडल्यावर त्याने मित्रासोबत अडीच लाखांची सुपारी घेऊन हत्या केल्याचे कबूल केले. 

सुपारी देणारे हे पोलीस हवालदार आणि रिक्षाचालकाची पोलीस पत्नी असल्याचे उघड झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि टीमने स्नेहल पाटील व विकास पष्टे या दोघांना अटक करून त्यांची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली आहे.

आरोपी हवालदाराने आखला प्लॅन

  • आरोपी विकास पष्टे याने दोन महिन्यांपूर्वी पुंडलिक पाटील यांच्या हत्येचा प्लान आखला होता. ओळखीचा वाडा येथील आरोपी तरुण वसईतील  इंडस्ट्रीमध्ये मित्रांसोबत कामाला होता. पष्टेने पुंडलिक याचा नंबर देऊन रिक्षाचे भाडे असल्याचे सांगण्यास सांगितले. दोनतीनदा तिन्ही आरोपींना पाटील यांनी त्यांच्या रिक्षाने घरी सोडले. 
  • ओळख झाल्याचे पाहून पष्टे याने अडीच लाखांची सुपारी देऊन हत्येचा प्लान सांगून अपघात झाल्यासारखे दाखवण्यास सांगितले. १८ फेब्रुवारीला आरोपीने ठरल्याप्रमाणे पुंडलिक यांना हायवेवर भाड्यासाठी बोलावले. या तिन्ही आरोपींकडे मोबाइल नव्हता व पष्टेचा मोबाइल नंबर कागदावर लिहिलेला होता.डाटा मिळू नये, याची काळजी घेत आरोपींनी फोन करण्यासाठी पानपट्टी, चणेवाला, अनोळखी तरुण यांच्याकडून फोन घेतला. 
  • सीसीटीव्हीच्या ठिकाणी काही करू नये, असेही पष्टे याने तिन्ही आरोपींना सांगितले होते. ज्या तरुणाकडून फोन करण्यासाठी घेतला होता, त्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे स्केच काढले. आरोपींकडून धागा राहणार नाही, याची काळजी घेतली असल्याचे स.पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले. ढेकाळे गावात पोहोचल्यावर आरोपींनी लोखंडी रॉडने डोक्यावर हल्ला करून हत्या केली. मृतदेह मागे टाकून रिक्षा ढकलून अपघाताचा बनाव आखला, पण तो डाव पोलिसांनी हाणून पाडला.

Web Title: Police woman plotted murder with the help of boyfriend; Rickshaw driver's husband killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस