ड्युटी संपवून घरी जाणारा पोलीस अपघातात जखमी, प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 11:05 PM2020-05-18T23:05:05+5:302020-05-18T23:07:35+5:30

रुग्णालयात उपचार सुरु 

A policeman on his way home from duty was seriously injured in an accident pda | ड्युटी संपवून घरी जाणारा पोलीस अपघातात जखमी, प्रकृती चिंताजनक

ड्युटी संपवून घरी जाणारा पोलीस अपघातात जखमी, प्रकृती चिंताजनक

Next
ठळक मुद्देसानपाडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार चव्हाण यांच्यासोबत हा अपघात घडला आहे. अपघातानंतर त्यांना जखमी अवस्थेत सीबीडी येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नवी मुंबई - ड्युटी संपून घरी जाणाऱ्या पोलिसाचाअपघात झाल्याची घटना सायन पनवेल मार्गावर शिरवणे लगत घडली आहे. यामध्ये पोलीस हवालदार गंभीर जखमी झाले असून त्यांना सीबीडीच्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सानपाडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार चव्हाण यांच्यासोबत हा अपघात घडला आहे. सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ते ड्युटी संपल्या नंतर मोटारसायकलवरून सीबीडी येथील पोलीस कॉलनीतील घरी चालले होते. दरम्यान त्यांची मोटरसायकल शिरवणे लगत आली असता त्यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना जखमी अवस्थेत सीबीडी येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु त्यांचा अपघात नेमका झाला कसा याचा उलगडा होऊ शकलेला नाही. परंतु अपघातामध्ये गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात सायबर क्राईमविरोधात कारवाई सुरूच, ३९५ गुन्हे दाखल

 

Coronavirus : लढवय्या २९१ पोलिसांनी केली कोरोनावर मात, आणखी लवकरच सुखरूप होऊन घरी परतणार

Web Title: A policeman on his way home from duty was seriously injured in an accident pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.