टॉयलेटमध्ये अडकलेल्या तरुणाची पोलिसांनी केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 10:12 PM2019-10-20T22:12:09+5:302019-10-20T22:13:56+5:30

मोबाईल टॉयलेटमध्ये एक 23 वर्षीय तरुण शुक्रवारी दुपारी अडकल्याची घटना घडली

Policeman rescued youth who were trapped in toilet | टॉयलेटमध्ये अडकलेल्या तरुणाची पोलिसांनी केली सुटका

टॉयलेटमध्ये अडकलेल्या तरुणाची पोलिसांनी केली सुटका

Next
ठळक मुद्देतब्बल एका तासानंतर नालासोपारा पोलिसांनी त्याची सुटका केली आहे.पोलीस कॉन्स्टेबल वैभव काकडे यांनी त्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

नालासोपारा - वसई विरार महानगरपालिकेने हद्दीमध्ये रस्त्यावर सर्वत्र रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांसाठी सुविधेकरिता मोबाईल टॉयलेट बसविण्यात आलेले आहेत. पण याच मोबाईल टॉयलेटमध्ये एक 23 वर्षीय तरुण शुक्रवारी दुपारी अडकल्याची घटना घडली होती. पण तब्बल एका तासानंतर नालासोपारा पोलिसांनी त्याची सुटका केली आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील साईबाबा मंदिराच्या समोरील रस्त्यावर वसई विरार महानगरपालिकेने मोबाईल टॉयलेट नागरिकांच्या सुविधेसाठी लावण्यात आले आहे. याच टॉयलेटमध्ये दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास धीरज कुमार पाल हा 23 वर्षीय तरुण अडकला होता. त्याने सुटकेसाठी नालासोपारा पोलीस ठाण्यात 2 ते 3 वेळा फोन केला पण त्याला पत्ता व्यवस्थित न सांगता आल्याने चार पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. पण असे टॉयलेट साईबाबा मंदिराच्या समोर असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी जाऊन पोलीस कॉन्स्टेबल वैभव काकडे यांनी त्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

Web Title: Policeman rescued youth who were trapped in toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.