हिंजवडीत धिंगाणा घालणारा पुण्यातील पोलीस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 06:59 PM2019-08-09T18:59:15+5:302019-08-09T18:59:28+5:30

पोलीस खात्यातील बड्या अधिकाऱ्यांची नावे घेत पोलीस शिपायाने धिंगाणा केला.

policeman suspended due to crime in the pune | हिंजवडीत धिंगाणा घालणारा पुण्यातील पोलीस निलंबित

हिंजवडीत धिंगाणा घालणारा पुण्यातील पोलीस निलंबित

Next

पिंपरी : दारु न दिल्याचा राग आल्याने एका पोलीस शिपायाने तोडफोड केली. तसेच हॉटेलमध्ये धिंगाणा घातला. पुणे शहर पोलीस दलातील या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या तीन साथीदारांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय मोहन धुमाळ (वय २४, रा. भवानीपेठ, पुणे) असे निलंबित झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याचे साथीदार अजय विजय खोत (वय २८), मंगेश महेंद्र रोकडे (वय ३१), जयंत बालमुकुंद साळुंके (वय २९, सर्व रा. पोलीस वसाहत, भवानी पेठ, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. हॉटेलमालक रामकिसन रमेश खैरनार (वय ३२, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
तीन साथीदारांसह अक्षय धुमाळ रविवारी (दि. ४) रात्री हिंजवडी येथे आला. आम्ही पोलीस आहोत, तू आमच्या माणासाला त्यादिवशी दारू का दिली नाही, असे म्हणून त्यांनी रामकिसन यांना शिवीगाळ केली. पोलीस खात्यातील बड्या अधिकाऱ्यांची नावे घेत धुमाळ याने धिंगाणा केला. हॉटेल बाहेरच्या दुचाकींना लाथा मारून त्याने चायनीज दुकानाची काच फोडली. हा सर्व प्रकार सीसीटव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: policeman suspended due to crime in the pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.