बापरे! Black Fungus मुळे दोन्ही डोळे गमावलेल्या पोलिसाची स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 03:41 PM2021-07-08T15:41:26+5:302021-07-08T15:48:26+5:30
Black Fungus And Police Suicide : ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. यामुळे रुग्णांना आपले डोळे गमवावे लागत आहेत.
देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 45,892 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 817 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,05,028 लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. यामुळे रुग्णांना आपले डोळे गमवावे लागत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे.
ब्लॅक फंगसमुळे दोन्ही डोळे गमावलेल्या पोलिसाने स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ही घटना घडली आहे. ब्लॅक फंगसमुळे एका पोलीस कर्मचाऱ्याला आपले दोन्ही डोळे गमवावे लागले. प्रमोद मेरगुरवर असं या 46 वर्षीय पोलिसाचं नाव असून त्यांनी आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेड कॉन्स्टेबल असलेल्या प्रमोद यांनी आपल्या राहत्या घरी दुपारच्या सुमारास स्वत: वरच गोळी झाडून आत्महत्या केली आहे. यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
CoronaVirus Live Updates : धोका वाढला! दोन महिन्यांत रुग्णाला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग, डॉक्टरांच्या चिंतेत भर#CoronaVirusUpdates#coronavirus#Corona#BlackFungus#Mucormycosishttps://t.co/3hPs5XP6av
— Lokmat (@MiLOKMAT) July 7, 2021
प्रमोद यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे होत होते. मात्र त्याच दरम्यान त्यांना ब्लॅक फंगसचा देखील संसर्ग झाला. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर काही दिवस उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी सुरुवातीला त्यांचा एक डोळा काढला पण त्यानंतर वेगाने संसर्ग झाल्याने त्यांनी दुसरा डोळा देखील गमावला. यामुळेच ते चिंतेत होते. प्रमोद यांना पत्नी आणि दोन लहान मुलं आहेत. त्यांनी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. त्यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
माणुसकीला काळीमा! महिलेला काही लोकांनी दिली होती धमकी त्यानंतर घरात घुसून मान कापली अन्...#crime#CrimeNews#Policehttps://t.co/Vl4VjG0MkK
— Lokmat (@MiLOKMAT) July 8, 2021
ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर पुन्हा एकदा हल्ला करतोय कोरोना; 2 महिन्यांत दुसऱ्यांदा लागण, डॉक्टरही हैराण
ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर पुन्हा एकदा कोरोना हल्ला करत आहे. दोन महिन्यांत रुग्णाला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरही या घटनेने हैराण झाले असून रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत. बिहारच्या वैशालीमध्ये राहणाऱ्या 43 वर्षीय रुग्णाला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काही दिवसांपूर्वी या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्याने यावर यशस्वीरित्या मातही केली होती. मात्र यानंतर ब्लॅक फंगसचा संसर्ग झाल्याने त्यांना पीएमसीएचमध्ये भरती करण्यात आलं. येथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी त्यांची चाचणी केली असता. दोन महिन्यांत दुसऱ्यांदा रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या घटनेने डॉक्टरांच्या चिंतेत भर पडली आहे.
धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद, Video व्हायरल#crime#CrimeNews#Police#Firinghttps://t.co/EkiL3WPGXd
— Lokmat (@MiLOKMAT) July 8, 2021